Advertisement

तुम्ही पाहिलात का 'बापजन्म' सिनेमाचा ट्रेलर


SHARES

काही सिनेमाचा टिजर रिलीज झाल्यावरच त्याची बरीच चर्चा होऊ लागते आणि प्रेक्षक त्या सिनेमाच्या ट्रेलरची वाट पाहू लागतात. 'बापजन्म' हा त्यातलाच एक सिनेमा. या सिनेमाचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच मुंबईमध्ये पार पडला. 

रंगभूमी कलाकार निपुण धर्माधिकारी यांचे दिग्दर्शन असलेला आणि सचिन खेडेकर व पुष्कराज चिरपूटकर यांची भूमिका असलेला ‘बापजन्म’या सिनेमाची टिजर नंतरच बरीच चर्चा रंगली होती. आता फायनली या सिनेमाचा ट्रेलर सर्वांसमोर आला आहे.मुलगा आणि त्याचे वडील या विषयावर अनेक चित्रपट आतापर्यंत आपण पहिले आहेत. पण निपुणने त्याच्या या बापजन्म चित्रपटात हे नाते अगदी वेगळेपणाने साकारण्याचा प्रयत्न केला आहे.

‘भारतीय डिजिटल पार्टी’साठीच्या ‘कास्टिंग काऊच वुईथ अमेय अँड निपुण’ या वेब शोने त्याला घराघरात पोहोचवले. त्यांच्या कामाची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली. ‘बापजन्म’ची कथा, पटकथा आणि संहिता निपुण धर्माधिकारीनेच लिहिली आहे. या सिनेमात सचिन खेडेकर आणि पुष्कराज चिरपूटकर यांच्यासह शर्वरी लोहोकरे, सत्यजित पटवर्धन आणि आकाश खुराणा यांच्याही भूमिका आहेत.डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा