Advertisement

'जिंदगी विराट' जगण्याची बाप गोष्ट सांगणारा चित्रपट!


'जिंदगी विराट' जगण्याची बाप गोष्ट सांगणारा चित्रपट!
SHARES

आतापर्यंत आपण मुलगा आणि बाप यांच्या नात्यावर असलेले सिनेमे पाहिले असतील. ज्यात बाप एकतर मुलाच्या सुखासाठी झटणारा असतो किंवा त्याच्या सुखाच्या आड येणारा, दारू पिणारा व्यसनी असतो. पण यापलिकडे जाऊन त्या बाप नावाच्या माणसाचीही काही स्वप्ने असू शकतात, आयुष्याकडून त्यालाही काही अपेक्षा असू शकतात. पण बापाने मुलासाठी त्याग करायचा असतो, या गोंडस विचाराच्या नादात ही स्वप्ने, या अपेक्षा आपण विचारात घेत नाही. 'जिंदगी विराट' ही अशाच एका बापाची अंतिम इच्छा पूर्ण करण्यासाठी धडपडणाऱ्या मुलाची गोष्ट आहे.



'जिंदगी विराट' या चित्रपटाची कथा महाराष्ट्रातल्या एका छोट्याशा अत्रंगी गावात घडते. सध्या पितृपक्ष पंधरवडा चालू आहे. या काळात मृतात्म्याला शांती मिळावी म्हणून पिंडाला कावळा शिवणे या विधीला अनन्यसाधारण महत्व आहे. मृत्यूकडे नेहमीच नकारात्मक भावनेने बघितले जाते. परंतु जन्म-मृत्यू आणि त्यासंबंधित मानवी भावभावना अत्यंत तरल पद्धतीने या चित्रपटातून मांडण्यात आल्या आहेत.

दिग्दर्शक सुमित संघमित्र यांचा हा पहिलाच चित्रपट असून या चित्रपटात लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय अशी तिहेरी जबाबदारी त्यांनी सांभाळलेली आहे. ओम भूतकर, सुमित संघमित्र, निनाद गोरे या तरुण कलाकारांची किशोर कदम, अतुल परचुरे, भाऊ कदम, उषा नाईक अशा दिग्गज कलाकारांबरोबर रंगलेली अभिनयाची जुगलबंदी सिनेमात पाहायला मिळणार आहे. येत्या २९ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.  



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा