Advertisement

पहा 'नशीबवान' भाऊचा ट्रेलर!

आपल्या विनोदी अभिनयामुळे महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांवर मोहिनी घालणाऱ्या भाऊच्या 'नशीबवान'चं पोस्टर लाँच झालं तेव्हापासूनच प्रेक्षकांना या चित्रपटाच्या ट्रेलरची उत्सुकता लागली होती. या चित्रपटात नक्की काय पहायला मिळणार? ही प्रतीक्षा अखेर संपली आहे.

पहा 'नशीबवान' भाऊचा ट्रेलर!
SHARES

मागील काही वर्षांपासून चित्रपटांसोबतच छोट्या पडद्यावरील 'चला हवा येऊ द्या'च्या माध्यमातून लोकप्रिय झालेला अभिनेता भाऊ कदम आता नशीबवान व्यक्तीच्या रूपात रसिकांना भेटणार आहे. भाऊची मुख्य भूमिका असलेल्या 'नशीबवान' या आगामी मराठी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच झाला आहे.


ट्रेलर लाँच

आपल्या विनोदी अभिनयामुळे महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांवर मोहिनी घालणाऱ्या भाऊच्या 'नशीबवान'चं पोस्टर लाँच झालं तेव्हापासूनच प्रेक्षकांना या चित्रपटाच्या ट्रेलरची उत्सुकता लागली होती. या चित्रपटात नक्की काय पहायला मिळणार?  ही प्रतीक्षा अखेर संपली आहे. 'नशीबवान' झलक दाखवणारा जबरदस्त ट्रेलर नुकताच लाँच झाला आहे. ट्रेलरवरून तरी या चित्रपटात काहीतरी भन्नाट पहायला मिळणार, असं दिसतंय. 


कुटुंबवत्सल भाऊ

कुटुंबवत्सल भाऊ या चित्रपटात सफाई कर्मचाऱ्याच्या भूमिकेत सर्वसामान्य आयुष्य जगताना दिसत आहे. अचानक त्यांच्या आयुष्यात असं काहीतरी घडतं आणि त्याचं नशीबच पालटून जातं. भौतिक सुखाचा आनंद उपभोगत असतानाच त्यांच्या आयुष्यात अनेक घडामोडी घडतानाही या ट्रेलरमध्ये दिसतात. चित्रीकरण रहदारीच्या ठिकाणी केल्यामुळे हा चित्रपट अतिशय वास्तववादी वाटतो. 


११ जानेवारीला प्रदर्शित 

या चित्रपटात कलाकारांना नैसर्गिक रूपात दाखवण्यात आलं आहे. वास्तववादी चित्र रेखाटण्यासाठी दिग्दर्शक अमोल गोळेने कलाकारांना मेकअपही केलेला नाही. कुठेही दिखाऊपणा, झगमगाट न दाखवता अतिशय सरळ पद्धतीनं या चित्रपटाची मांडणी केली आहे. भाऊसोबत मिताली जगताप वराडकर आणि नेहा जोशी या चित्रपटात आहेत. या जबरदस्त ट्रेलरवरून चित्रपटही एकदम झकास असेल यात शंका नाही. हा चित्रपट येत्या ११ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. 

https://www.youtube.com/watch?v=y2dcwljeJS0हेही वाचा - 

मिका सिंगला दुबईत अटक, लैंगिक शोषणाचा आरोप

१७ वा आशियाई चित्रपट महोत्सव १४ डिसेंबरपासून 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा