Advertisement

१७ वा आशियाई चित्रपट महोत्सव १४ डिसेंबरपासून

सुमित्रा भावे आणि सुनील सुखटणकर यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या 'वेलकम होम' या मराठी चित्रपटाने १७ व्या थर्ड आय चित्रपट महोत्सवाचं उद्घाटन होईल.

१७ वा आशियाई चित्रपट महोत्सव १४ डिसेंबरपासून
SHARES

भारतातील महत्त्वाच्या चित्रपट महोत्सवांपैकी एक असलेला १७ वा थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव १४ ते २० डिसेंबर या कालावधीत सिटीलाईट सिनेमा (माहीम) येथे संपन्न होणार आहे.  हा चित्रपट महोत्सव रसिकांसाठी जणू मेजवानी ठरणारा आहे.


वेलकम होमने उद्घाटन

सुमित्रा भावे आणि सुनील सुखटणकर यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या 'वेलकम होम' या मराठी चित्रपटाने १७ व्या थर्ड आय चित्रपट महोत्सवाचं उद्घाटन होईल. या चित्रपटामध्ये मृणाल देव, सुमित राघवन, सुबोध भावे यांच्या भूमिका आहेत. या महोत्सवात इटलीचे स्पेगेटी वेस्टर्न, महिला दिग्दर्शक, स्पेक्ट्रम आशिया, इंडियन व्हिस्टा अशा विविध विभागांतर्गत निरनिराळे चित्रपट दाखवण्यात येतील.


ऑनलाईन रजिस्ट्रेशन

या महोत्सवासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन www.affmumbai.org या बेबसाईटवर सुरु झालं अाहे. सिटीलाईट सिनेमामध्ये ७ डिसेंबरपासून दुपारी २ ते ८ या वेळेत रजिस्ट्रेशन करता येईल.



हेही वाचा - 

मिका सिंगला दुबईत अटक, लैंगिक शोषणाचा आरोप

'बॅटमॅन'ने विजयला दिला 'वर्तुळ'मधील खलनायक!




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा