Advertisement

'व्हेंटिलेटर'चा ट्रेलर प्रदर्शित


'व्हेंटिलेटर'चा ट्रेलर प्रदर्शित
SHARES

मुंबई - प्रियंका चोप्रा निर्मित पहिला मराठी सिनेमा 'व्हेंटिलेटर'चा ट्रेलर प्रदर्शित झालाय. ‘फेरारी की सवारी’ सारखा हिट चित्रपट देणारे दिग्दर्शक राजेश मापुसकर या चित्रपटामधून मराठी दिग्दर्शनात पदार्पण करतायेत. यापूर्वी अनेक मराठी चित्रपटांमधून अभिनयाची छाप सोडणारे आशुतोषही या चित्रपटाद्वारे तब्बल अठरा वर्षांनी पुनरागमन करतायत.

'व्हेंटिलेटर'मध्ये एका कुटुंबाची गोष्ट पाहायला मिळणार आहे. एका घटनेमुळे एकाच ठिकाणी आलेलं कामेरकर कुटुंब आणि त्यातल्या सदस्यांतून उलगडत जाणारे नात्यांचे विविध पैलू हे अतिशय खुमासदार पद्धतीनं सांगणारी ही गोष्ट आहे. या दिवाळीत हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या ४ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होईल. व्हेंटिलेटरचा ट्रेलर पाहण्यासाठी इथे क्लिक करा ​https://www.youtube.com/watch?v=bAbgx1hi71o

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा