Advertisement

‘टीटीएमएम’चा टीजर लाँच


‘टीटीएमएम’चा टीजर लाँच
SHARES

‘टीटीएमएम’ ह्या नावानेच उत्सुकता निर्माण केलेला 'तुझं तू माझं मी' सिनेमाचा टीजर नुकतंच लाँच झालय. ललित प्रभाकर आणि नेहा महाजन ही नवीन जोडी आपल्याला या सिनेमात पाहायला मिळणार आहे.

टीजर मध्ये नायिकेच्या म्हणजेच नेहाच्या घरी लग्नासाठी तिच्या पाठी लागलेत. पण तिच्या होणाऱ्या नवऱ्याकडून काही अपेक्षा आहेत. दुसरीकडे नायकाच्या म्हणजेच ललितच्या घरीही लग्नाची बोलणी सुरु आहेत. पण त्याला इतक्यात लग्न करायचं नाहीये. त्याला वेगवेगळ्या ठिकाणी फिरण्याची खूप आवड आहे.

हे दोघेही आपापल्या लग्नाच्या दिवशी घरातून पळून जातात आणि त्यानंतर त्यांची ओळख होते. हे टीजर मधून समजतंय. टीजर चांगला आहे. आता ट्रेलर ची वाट पाहावी लागणारये तोपर्यंत हा टीजर तुम्ही ही पहा.  

संबंधित विषय
Advertisement