शास्त्रीय संगीताची मेजवानी


SHARE

गोरेगाव - भारतीय शास्त्रीय संगीताच्या प्रसारासाठी काम करत असलेल्या स्वानंद संगीत सभा या संस्थेचा त्रैमासिक संगीत कार्यक्रम २५ सप्टेंबरला होणार आहे. स्वानंद संगीत सभा आणि गान कला विद्या निलयम यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमात पं. डी. के. दातार यांचे शिष्य राजन माशेलकर व्हायोलिन वादन सादर करणार आहेत. तर गायक विश्वास शिरगांवकर शास्त्रीय गायन सादर करणार आहेत. गोरेगावच्या शास्त्रीनगर परिसरातल्या त्रिवेणी इमारतीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या