Advertisement

तुझ्यात जीव रंगला


तुझ्यात जीव रंगला
SHARES

मुंबई - झी मराठीवर 'तुझ्यात जीव रंगला' ही नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

३ ऑक्टोबरपासून संध्याकाळी ७.३० वाजता ही नवी मालिका दाखवण्यात येणार आहे. 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेची कथा आहे राणा आणि अंजलीच्या प्रेमाची. कोल्हापूर जवळच्या छोट्याशा गावात राहणारा राणा गायकवाड हा तालमीतला पहेलवान. तालमीचा आखाडा हेच त्याचं जीवन आणि कुस्ती हेच त्याचं प्रेम. शरीराने जरी रांगडा असला तरी मनाने तो अतिशय हळवा आहे. दुसरीकडे वडिलांच्या नोकरीतील बदलीमुळे त्या गावात आलेली अंजली ही एक सुशिक्षित मुलगी आहे. आपल्या शिक्षणाचा उपयोग गावातील मुलांनाही व्हावा म्हणून ती गावातील शाळेत शिक्षिकेची नोकरी करत आहे. या दोघांच्या प्रेमाची कथा मालिकेतून मांडण्यात आलीय.

संबंधित विषय
Advertisement