गुरमीत चौधरीला चाहत्याकडून धमकी, ट्विटरवर खुलासा


  • गुरमीत चौधरीला चाहत्याकडून धमकी, ट्विटरवर खुलासा
SHARE

अनेकवेळा सेलेब्रेटींसाठी त्यांचे फॅन्स डोकोदुखी ठरतात. त्यांचे फॅन हे त्यांच्यासाठी वाट्टेल ते करायला तयार असतात. असाच काहीसा प्रकार घडलाय तो टेलेव्हिजन अभिनेता गुरमीत चौधरी बरोबर. गुरमीतचा जबरा फॅन गेल्या काही दिवसापासून गुरमीतला मी सुसाइज करेन, अशी धमकी देत आहे.


गुरमीतचा खुलासा

याबबात खुद्द गुरमीतनेच सोशल मीडियावर खुलासा केला आहे. गुरमीतने धमकी देणाऱ्या त्या फॅनचा फोटो आणि मेसेज सोशल मीडियावर शेअर केला आहे. गुरमीतने याविषयी ट्वीटही केलं आहे.


 


'जगभरातून माझे फॅन मला सतत फोन आणि मेसेज करत आहेत. ते मला सांगत आहेत की, कोणतरी माझा जबरदस्त फॅन आहे हे सिद्ध करण्यासाठी आत्महत्या करू शकतो. मी तुम्हा सगळ्यांवर खूप प्रेम करतो. परंतु अशापद्धतीचं वागणं योग्य नाही. हा फोटोतला मुलगा मला मारण्याची धमकी देत आहे.’ असं गुरमीतने ट्वीटमध्ये म्हटलंय.


 

या मेसेजमध्ये तो मुलगा गुरमीतशी कॉन्टॅक्ट करण्याबबात बोलत आहे. त्याचबरोबर एकतर मी आत्महत्या करेन किंवा गुरमीतला मारेन, अशी धमकी गुरमीतला दिली आहे. गुरमीतची ही पोस्ट काही मिनिटातच मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली. गुरमीतचे फॅन्स या परिस्थितीत गुरमीतला सपोर्ट करत आहेत.

संबंधित विषय
ताज्या बातम्या