हॅपी बर्थडे शोमन...

Pali Hill
हॅपी बर्थडे शोमन...
हॅपी बर्थडे शोमन...
See all
मुंबई  -  

मुंबई - हिंदी चित्रपटसृष्टी म्हटलं की अभिनेता आणि ग्रेटेस्ट शोमन म्हणून ओळख असलेल्या राज कपूर यांच्या नावाचा उल्लेख हमखास होतो. १४ डिसेंबर १९२४ रोजी पेशावरमध्ये राज कपूर यांचा जन्म झाला होता. आज या लोकप्रिय अभिनेत्याच्या जन्मदिनी सर्वत्र त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जातोय.

वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षापासूनच राज कपूर यांची ओळखचित्रपटसृष्टीशी झाली. सहाय्यक आणि क्लॅपर बॉय म्हणून काम केलेल्या याच राज कपूर यांनी नंतर हिंदी चित्रपटसृष्टीलाच एक नवा चेहरा मिळवून दिला. एक अभिनेता म्हणूनच नाही तर निर्माता आणि दिग्दर्शक म्हणूनही त्यांनी चांगलीच छाप उमटवली होती. चार्ली चॅप्लिनकडून प्रेरणा होत राज कपूर यांनी त्यांचे चित्रपट एका नव्या अंदाजात आणले. बरसात, आवारा, श्री 420, संगम, राम तेरी गंगा मैली, सत्यम शिवम सुंदरम असे अनेक हिट चित्रपट त्यांनी दिले. मेरा नाम जोकर हा त्यांचा महत्त्वाकांक्षी चित्रपट सुरुवातीला मात्र फारसं यश मिळवू शकला नाही.

तर श्याम बेनेगल यांचाही जन्म 14 डिसेंबरचाच. या दिवशी 1934मध्ये ते जन्मले. बेनेगल यांनी अनेक चित्रपटांचं दिग्दर्शन केलं. बेनेगल यांनीच शबाना आझमी आणि स्मिता पाटील यांना पहिला ब्रेक दिला. बेनेगल यांना कलामहर्षी बाबूराव पेंटर जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. तसंच पद्मश्री पुरस्कार, पद्मविभूषण पुरस्कार, दादासाहेब फाळके पुरस्कारानंही गौरवण्यात आलं होतं. अंकुर, निशांत असे त्यांचे चित्रपट गाजले. भारत एक खोज या मालिकेचीही निर्मिती त्यांनीच केली होती.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.