उल्का गुप्ताला मराठीची ‘ओढ'

Pali Hill
उल्का गुप्ताला मराठीची ‘ओढ'
उल्का गुप्ताला मराठीची ‘ओढ'
उल्का गुप्ताला मराठीची ‘ओढ'
उल्का गुप्ताला मराठीची ‘ओढ'
See all
मुंबई  -  

मुंबई - ‘झाँसी की रानी’ मालिकेतील छोट्या लक्ष्मीबाईच्या व्यक्तीरेखेमुळं प्रचंड लोकप्रियता मिळवणारी अभिनेत्री उल्का गुप्ता आगामी 'ओढ' चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करतेय. ‘सोनाली एंटरटेन्मेट हाऊस’ निर्मित, ‘जी. एस. फिल्मस अकादमी प्रॉडक्शन’ प्रस्तुत ‘ओढ द अॅक्शन’ या मराठी सिनेमाची निर्मिती एस. आर. तोवर यांनी केली असून दिग्दर्शन दिनेश ठाकूर करत आहेत.

मैत्रीला वयाचं बंधन नसतं पण समवयस्क मुलगा आणि मुलगी यांच्यातही निखळ मैत्री असू शकते यावर समाजाचा विश्वास बसत नाही. अशाच एका निर्मळ मैत्रीची कथा ‘ओढ' या सिनेमामधून उलगडणार आहे. उल्कासोबत गणेश तोवर हा नवोदित अभिनेता या सिनेमातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करतोय. मोहन जोशींच्या मुलीच्या भूमिकेत आपल्याला उल्का यात पहायला मिळणार आहे. याआधी तिनं हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटातही काम केलंय.
‘ओढ’ चित्रपटाची कथा-पटकथा दिग्दर्शन दिनेश ठाकूर यांचंच असून संवाद गणेश कदम यांनी लिहिले आहेत.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.