Advertisement

नवरा बायकोतील रुसवा फुगवा आणि प्रेम दाखवणारा 'तुला कळणार नाही'!


SHARES

सोनाली कुलकर्णी आणि सुबोध भावे यांची जोडी पहिल्यांदाच पडद्यावर दिसणार आहे. 'तुला कळणार नाही' या सिनेमात आपल्याला ही जोडी एकत्र दिसणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च सचिन आणि सुप्रिया पिळगावकर यांच्या हस्ते पार पडला.

नवरा-बायकोच्या नात्यातील रुसवा-फुगवा, अनामिक ओढ आणि एकमेकांवरचे अबोल प्रेम दाखवणारा हा ट्रेलर घराघरातील प्रत्येक नवराबायकोला आपलासा करणारा आहे. वैवाहिक नात्यात बांधलो गेले असल्यामुळे सोडता येत नाही आणि पकडता देखील येत नाही अशी गत आपल्यापैकी अनेकांची झाली असते. त्यावेळी ते कोणता मार्ग निवडतात? जोडीदारांचे वाढते अहंकार आणि त्यासोबतच वाढत जाणा-या अव्यक्त प्रेमाची जाणीव, या द्वंदात अडकलेल्या जगातल्या प्रत्येक नवरा-बायकोची सुंदर कथा या ट्रेलरमध्ये दिसून येते. विशेष म्हणजे या सिनेमाच्या ट्रेलरमधील सुबोध- सोनालीची केमिस्ट्री अगदी चांगली जुळून आली आहे.

मराठीचा सुपरस्टार स्वप्नील जोशी या सिनेमाचा निर्माता आहे. योगेश कदम यांचा देखील या सिनेमाच्या निर्मितीत महत्वाचा हात असून, निरव शाह, इलाची नागदा आणि जयेश मुझुमदार यांनी सहनिर्मितीची धुरा सांभाळली आहे.

'मोडीत निघालेल्या ओढीची... गोष्ट वेड्या जोडीची...' अशी भन्नाट प्रेमकहाणी सांगणारा हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा