Advertisement

ज्येष्ठ मराठी अभिनेते विजय चव्हाण यांचं निधन!


ज्येष्ठ मराठी अभिनेते विजय चव्हाण यांचं निधन!
SHARES

ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचं आज दीर्घ आजारानं निधन झालं. श्वास घ्यायला त्रास होत असल्याच्या तक्रारीनंतर बुधवारी (२२ ऑगस्ट) रोजी विजय चव्हाण यांना मुलुंडच्या फोर्टीस रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीतील तारा निखळल्याची भावना व्यक्त होत आहे


मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म

विजय चव्हाण यांचा जन्म लालबागमधल्या मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. लालबागमधील प्रसिद्ध भारतमाता चित्रपटगृहाच्या मागच्या बाजूला असलेल्या हाजी कासम चाळीत ते लहानाचे मोठे झाले. विजय चव्हाण यांनी त्यांचं महाविद्यालयीन शिक्षण रुपारेल कॉलेजमधून पूर्ण केलं. कॉलेजमध्ये असताना ते अनेक एकांकिकांमध्ये भाग घेत असत. विजय चव्हाण यांना त्यांची पहिली एकांकिका विजय कदम यांच्यामुळे मिळाली.


अभिनयाचा ठसा

मराठी सिनेसृष्टीत विजूमामा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चव्हाण यांनी मराठी सिनेसृष्टीसोबतच रंगभूमीवरही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. ‘मोरुची मावशी’ या नाटकात त्यांनी साकारलेली मावशी, तसंच ‘श्रीमंत दामोदर पंत’ या नाटकातील अण्णा कायम स्मरणात राहणारे आहेत. आपल्या प्रदीर्घ सिनेकारकिर्दीत विजूमामांनी नायक, खलनायक, विनोदी अभिनेता, चरित्र अभिनेता अशा विविध प्रकारच्या भूमिका यशस्वीपणे साकारल्या आहेत.

विजय चव्हाण यांना एक ताकदीचा विनोदी अभिनेता म्हणून मराठी रसिक ओळखतात, मात्र त्याचसोबत त्यांनी गंभीर आशयाच्या भूमिकाही समर्थपणे साकारल्या. मराठी सिनेसृष्टीच्या अलिकडच्या कालखंडातील स्थित्यंतरात चव्हाण यांनी बहुमूल्य योगदानही दिलं होतं. त्यांच्या निधनाने मराठी रंगभूमीचे मोठे नुकसान झालं आहे.

- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अभिनेते विजय चव्हाण यांच्या निधनाने चित्रपट आणि नाटक क्षेत्राची मोठी हानी झाली असून महाराष्ट्राने अष्टपैलू अभिनेता गमावला आहे

- विनोद तावडे, सांस्कृतिक कार्यमंत्री


हेही वाचा -

असा होता 'विजूमामां'चा सिनेसृष्टीतला प्रवास

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा