विद्यानं केलं तोंड गोड

 Mumbai
विद्यानं केलं तोंड गोड
विद्यानं केलं तोंड गोड
विद्यानं केलं तोंड गोड
See all

मुंबई - हिंदी चित्रपटाचे निर्माते हल्ली आपल्या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी नवनवीन शक्कल लढवत असतात. अशीच शक्कल ‘कहानी 2’च्या निर्मात्यांनी लढवली. त्यानुसार अभिनेत्री विद्या बालन कोलकात्यामधील प्रसिद्ध ‘गुप्ता ब्रदर्स’ या मिठाईविक्रीच्या दुकानात पोचली. विद्या मिठाई खरेदीच्या निमित्तानं या दुकानात पोचली आणि तिनं तिथल्या सर्व मिठाई निर्मितीची प्रक्रिया समजून घेतली. ‘कहानी 2’ची निर्मिती जयंतीलाल गडा यांची असून दिग्दर्शन सुजॉय घोष यांनी केलीय. येत्या 2 डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचा पहिला भाग मार्च 2012 मध्ये प्रदर्शित झाला होता. या रहस्यमय चित्रपटाचं प्रेक्षकांनी मोठं स्वागत केलं होतं.

Loading Comments