विन डिझलचं मराठमोळ्या पद्धतीने स्वागत

  Pali Hill
  विन डिझलचं मराठमोळ्या पद्धतीने स्वागत
  मुंबई  -  

  मुंबई - हॉलिवूड अॅक्शन स्टार विन डिझेलची तरूणाईमध्ये मोठी क्रेझ आहे. विन डिझेल गुरुवारी मुंबईत दाखल झाला. त्याच्या 'ट्रिपल एक्स' चित्रपटाचा सिक्वेल जगात सर्वात आधी भारतात रिलीज होणार आहे. यासाठीच विन डिझेल भारतात आला आहे. महत्त्वाचं म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोन या चित्रपटातून विन डिझेलसोबत हॉलिवूड चित्रपट इंडस्ट्रीत पदार्पण करत आहे. विन मुंबई विमानतळातून बाहेर पडला तेव्हा दीपिकाही त्याच्यासोबत होती. यावेळी पारंपरिक नऊवार साडी नेसलेल्या आणि फेटा परिधान केलेल्या मुलींनी टिळा लावून त्यांचं स्वागत केलं. यानंतर माध्यमांच्या तावडीत न सापडता विन डिझेलनं थेट सेंट रेगिस हॉटेल गाठलं. त्याच्या मुंबई दौ-यादरम्यान तो इथेच वास्तव्य करणार आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.