सलमान-आमिरमध्ये टाय

 Mumbai
सलमान-आमिरमध्ये टाय
Mumbai  -  

मुंबई - आता तुम्ही म्हणाल की सलमान खान आणि आमिर खानमध्ये मॅच नेमकी कधी झाली? अहो, ही कोणत्याही ग्राऊंडवरची मॅच नाही. बॉलिवुडमधल्या बॉक्स ऑफिसवरची ही मॅच आहे. त्याचं झालं असंय की, गेल्या काही वर्षांपासून हिंदी चित्रपटसृष्टीवर नेमकं राज्य कुणाचं यावर बरीच चर्चा सुरू आहे. काहींच्या मते, किंग खान शाहरूखच आघाडीवर आहे. परंतु, बॉक्स ऑफिसवरील आकड्यांची मदत घेतल्यास खरी मॅच सलमान आणि आमिरमध्येच सुरू असून शाहरूख त्यांच्या जवळपासही नाही. 'दंगल' प्रदर्शित होईपर्यंत सलमानची वेगानं नंबर 1 पदाकडे वाटचाल सुरू होती. गेल्या दोन वर्षांमधील बॉक्स ऑफिसवरील कामगिरी लक्षात घेता रु. 300 कोटींच्या पलीकडे अवघे तीनच चित्रपट होते. त्यापैकी एक आमिरच्या (पीके-340 कोटी) नावावर तर इतर दोन सलमानच्या नावावर (बजरंगी भाईजान- रु. 320 कोटी, सुलतान-रु. 300 कोटी) जमा आहेत. परंतु, बुधवारी 'दंगल' चित्रपटानं रु. 300 कोटींचा टप्पा पार केला नी रु. 300 कोटींच्या क्लबमध्ये सलमानच्या दोन चित्रपटांशी आमिरच्या दोन चित्रपटांची बरोबरी झाली.

Loading Comments