उंबरठामध्ये कोण मारणार बाजी?

 Dadar
उंबरठामध्ये कोण मारणार बाजी?
Dadar , Mumbai  -  

दादर - 14 व्या उंबरठा खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये 17 डिसेंबरपासून एक आगळा-वेगळा सामना रंगला आहे. व्यावसायिकरण झालेल्या श्यामची आई या एकांकिकेची टक्कर यंदा पुरुषोत्तम करंडक जिंकणाऱ्या अहमदनगर नाट्यवाडाच्या पाझर या एकांकिकेशी होणार आहे. त्यामुळे या दोघांमध्ये कोण बाजी मारणार याबद्दल उत्सुकतेचं वातावरण आहे. यंदा उंबरठामध्ये 8 एकांकिका अंतिम फेरीमध्ये दाखल झाल्या आहेत. त्यात श्यामची आई आणि पाझर यांची या आधीची कामगिरी पाहता उंबरठामध्ये बाजी मारून कोण सवाईसाठी पात्र ठरणार, हे पाहावं लागेल.

Loading Comments