फरहान अख्तर आणि श्रद्धा कपूर करणार लग्न?

  Mumbai
  फरहान अख्तर आणि श्रद्धा कपूर करणार लग्न?
  मुंबई  -  

  अखेर बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर आणि त्याची हेअरस्टायलिस्ट पत्नी अधुना भबानी हे विभक्त झालेत. यासंदर्भात ऑफिशियल अनाऊंसमेंटही करण्यात आली आहे. पण आता असं ऐकण्यात येतंय की, फरहान लवकरच दुसरं लग्न करणार आहे. पण कुणाशी? असा प्रश्न नक्कीच तुम्हाला पडला असेल. तुमचा संशय अगदी बरोबर आहे. ही दुसरी तिसरी कुणी नाही तर श्रद्धा कपूरच असल्याची चर्चा जोरात सुरूये. २൦१७ मध्ये ही दोघं लग्नाच्या बंधनात अडकतील, अशी चर्चा सध्या बी-टाऊनमध्ये रंगलीय.

  आता समस्या अशी आहे की फरहान आणि श्रद्धाच्या नात्याला श्रद्धाचे वडील शक्ती कपूर यांचा मात्र विरोध आहे. मध्यंतरी फरहान आणि श्रद्धा लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत असल्याचं बोललं जात होतं. पण जेव्हा वडिलांना हे कळलं तेव्हा वडील तिला फरहानच्या घरातून जबरदस्ती घेऊन गेल्याचीही चर्चा होती. त्यामुळे जर फरहान आणि श्रद्धा लग्न करत असतील तर शक्ती कपूर यांचा लग्नाला विरोध असेल की पाठिंबा हे लवकरच कळेल.

  फरहान आणि अधुना 'दिल चाहता है'च्या शूटिंगदरम्यान भेटले होते. दिग्दर्शक म्हणून फरहानचा हा पहिलाच चित्रपट होता. तीन वर्षांच्या डेटनंतर पुढे या जोडप्याने लग्न केलं. त्यांना दोन मुलीही झाल्या. मात्र नंतरच्या काळात त्यांच्यात बेबनाव झाला आणि त्यानंतर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. या दोघांच्या घटस्फोटासाठी श्रद्धा कपूर कारणीभूत असल्याचंही बोललं जात होतं.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.