दिंडोशीत युवासेनेचा युवा जल्लोष

  Dindoshi
  दिंडोशीत युवासेनेचा युवा जल्लोष
  मुंबई  -  

  दिंडोशी - युवासेनेच्या वतीने युवा जल्लोष 2016 चं आयोजन करण्यात आले आहे. यंदा या युवा जल्लोषाचं 4 थे वर्ष आहे. या युवा जल्लोषच्या वतीने पराग श्री 2016 खुली शरीर सौष्ठव स्पर्धा आणि भव्य नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. येत्या 10 आणि 11 डिसेंबर रोजी संध्याकाळी 6 ते 10 या वेळेत वीर (प्रज्ञा) सावरकर मैदान, कुरारगाव, मालाड पूर्व येथे या स्पर्धेचे आयोजन केले आहे. पराग श्री 2016 मध्ये महाराष्ट्रातून अनेक स्पर्धक सहभागी होणार आहेत. नृत्य स्पर्धेत मालाडमधून 25 नृत्यकलाकार सहभाग घेणार आहेत, अशी माहिती युवा सेनेचे विभाग अधिकारी रुपेश कदम यांनी दिली.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.