Advertisement

असा रंगला 'झी टॅाकीज कॅामेडी अवॉर्ड्स'सोहळा


असा रंगला 'झी टॅाकीज कॅामेडी अवॉर्ड्स'सोहळा
SHARES

‘कुणी निंदा, कुणी वंदा, हसवणे हाच आमचा धंदा’, असं म्हणत रसिकांचे भरपूर मनोरंजन करणाऱ्या विनोदी कलावंतांचा गौरव करणारा ‘झी टॅाकीज कॅामेडी अवॉर्ड्स’ सोहळा नुकताच दिमाखात संपन्न झाला. या सोहळ्याचे सूत्रसंचालन स्वप्नील जोशी आणि पुष्करराज चिरपुटकर यांनी केले. मराठी चित्रपट आणि रंगभूमीवरील कलाकारांच्या धमाकेदार सादरीकरणाने उपस्थितांचे चांगलेच मनोरंजन केले. सोनाली कुलकर्णी, मानसी नाईक, गश्मीर महाजनी, सुमेध मुधोळकर, बॉबी विज यांच्या नृत्याविष्काराने सर्वांची मने जिंकली. सई ताम्हणकर संतोष पवार, प्रियदर्शन जाधव, समीर चौघुले, नम्रता आवटे, शशिकांत केरकर यांच्या बहारदार स्किट्सने उपस्थितांना मनसोक्त हसवले. 

यावर्षीच्या पुरस्कारांमध्ये ‘वाय झेड’ चित्रपटाने व ‘९ कोटी ५७ लाख’ या नाटकाने पुरस्कार सोहळ्यावर आपली ठसठशीत मोहोर उमटवली, तर चित्रपट विभागात ललित प्रभाकर याला सर्वोत्कृष्ट नायकाचा तर सई ताम्हणकर हिने सर्वोत्कृष्ट नायिकेचा मान मिळवला. नाटक विभागात आनंद इंगळे व सुलेखा तळवलकर यांनी बाजी मारली. तसेच पुनरुज्जीवित नाटक विभागात ‘शांतेच कार्ट चालू आहे’ नाटकाला सर्वोत्कृष्ट नाटकाचा पुरस्कार मिळाला. याच विभागासाठी व याच नाटकासाठी अभिनेता प्रियदर्शन जाधव व अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी पुरस्कार पटकावले.

आपल्या चतुरस्त्र अभिनयाने सिनेनाट्यसृष्टी गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना या सोहळ्यात प्रतिष्ठेचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. लोकनाट्याचा विशेष पुरस्कार ज्येष्ठ कलावंत वसंत अवसरीकर यांना देण्यात आला. तर वेब निर्मितीचा विशेष ज्युरी पुरस्कार ‘भारतीय डिजीटल पार्टी’ला मिळाला.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा