Advertisement

यंदा पावसाळ्यात २८ दिवस मोठी भरती आणि १२ दिवस नीप टाईड

यंदा पावसाळ्यात २८ दिवस मोठी भरती असणार असून १२ दिवस नीप टाईड असणार असल्याची माहिती पालिकेनं दिली आहे.

यंदा पावसाळ्यात २८ दिवस मोठी भरती आणि १२ दिवस नीप टाईड
SHARES

पावसाळ्यात समुद्रातील भरतीच्यावेळी मुसळधार पाऊस पडल्यास मुंबईची 'तुंबई' होते.  तसंच, जास्तीचा पाऊस पडल्यास पावसाचे पाणी समुद्रात वाहून जाण्याचा मार्ग मंदावतो. यामुळे मुंबईची तुंबापुरी होण्याची शक्यता असते. त्यामुळं दरवर्षी याबाब त माहिती पालिकेतर्फे देण्यात येते. यंदाही पालिकेकडून ही माहिती देण्यात आली असून यंदा पावसाळ्यात २८ दिवस मोठी भरती असणार असून १२ दिवस नीप टाईड असणार आहे. दरम्यान, पावसाळ्यातील ‘नीप टाईड’चे दिवसही मुंबईकरांसाठी धोकादायक ठरत आहेत. २ वर्षांपूर्वी नीप टाईडच्या दिवशी मोठा पाऊस झाल्यानं मुंबईची तुंबई झाली होती. त्या


.५ मीटर उंचीच्या लाटा

मोठ्या भरतीच्या दिवशी समुद्रात ४.५ मीटर उंचीच्या लाटा उसळतात. अशा वेळी मुसळधार पाऊस कोसळल्यास मुंबईतील सकल भागांमध्ये पाणी तुंबतं. त्यामुळं दरवर्षी पावसाळ्यापूर्वी अशा मोठ्या भरतीच्या दिवसांची यादी तयार करून त्या दिवशी महापालिकेतर्फे किनारपट्टीवर विशेष काळजी घेतली जाते. मोठ्या भरतीच्या दिवसांबरोबरच नीप टाईडच्या दिवसांचीही यादी पालिकेनं तयार करण्यास सुरुवात केली. या दोन्ही भरतीच्या याद्या वाहतूक पोलीस, अग्निशमन दल आणि अन्य प्राधिकरणांना महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागानं पाठवल्या आहेत. त्यामुळं भरतीच्या दिवशी मुंबईकर आणि संबंधित यंत्रणा सतर्क राहतील. तसंच, कोणत्याही प्रकारची जीवित व वित्तहानी होणार नाही.


मोठ्या भरतीची यादी


तारीख
 लाटींची उंची
३/५/२०१९
१२.१२ मी.
४/५/२०१९
.६४ मी.
५/५/२०१९
.६८ मी.
६/५/२०१९
.६५ मी.
७/५/२०१९
.५५ मी.
१७/५/२०१९
.५१ मी.
२/६/२०१९
.५४ मी.
३/६/२०१९
.६९ मी.
४/६/२०१९
.७८ मी.
५/६/२०१९
.७९ मी.
६/६/२०१९
.७४ मी.
७/६/२०१९
.६० मी.
३१/६/२०१९
.५३ मी.
१/८/२०१९
.७४ मी.
२/८/२०१९
.८७ मी.
३/८/२०१९
.९० मी.
४/८/२०१९
.८३ मी.
५/८/२०१९
.६५ मी.
२९/८/२०१९
.५३ मी.
३०/८/२०१९
.७७ मी.
३०/८/२०१९
.९० मी.
१/९/२०१९
.९१ मी.
२/९/२०१९
.६७ मी.
३/९/२०१९
.५४ मी.
२७/९/२०१९
.५१ मी.
२८/९/२०१९
.७२ मी.
२९/९/२०१९
.६३ मी.
३०/९/२०१९
.८३ मी.


या दिवशी असणार नीप टाईड

समुद्रात मोठी भरती आणि आहोटी नसते त्याला नीप टाईड असं म्हटलं जातं. यंदा जून महिन्यात २५, २६, २७ तारीख, जुलै महिन्यात २५, २६, २७, तसंच, ऑगस्ट महिन्यात २४ आणि २५, सप्टेंबर महिन्यात ७, , २२, २३ या दिवशी नीप टाईड असणार आहे.



हेही वाचा -

'एका सेल्फीसाठी स्वतःच्या जीवाशी खेळू नका', मुंबई पोलिसांचे आवाहन

सीएसएमटी स्थानकात बफरला धडकलेल्या लोकलमधील मोटरमनचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा