'एका सेल्फीसाठी स्वतःच्या जीवाशी खेळू नका', मुंबई पोलिसांचे आवाहन

संपुर्ण देशात आणि जगभरात अनेकांना सेल्फी काढण्याच्या नादात आपले प्राण गमावावे लागले आहेत. याबाबत वारंवार पोलिसांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन केलं. मात्र, तरीसुद्धा काही जण सेल्फीच्या नादात आपला जीव गमवतात. त्यामुळं या प्रकाराला आळा घालण्यासाठी मुंबई पोलिसांनी एक व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला आहे.

'एका सेल्फीसाठी स्वतःच्या जीवाशी खेळू नका', मुंबई पोलिसांचे आवाहन
SHARES

संपुर्ण देशात आणि जगभरात अनेकांना सेल्फी काढण्याच्या नादात आपले प्राण गमावावे लागले आहेत. याबाबत वारंवार पोलिसांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन केलं. मात्र, तरीसुद्धा काही जण सेल्फीच्या नादात आपला जीव गमवतात. त्यामुळं या प्रकाराला आळा घालण्यासाठी मुंबई पोलिसांनी एक व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये सेल्फीच्या मोहामुळं एका तरूणानं जीव गमावल्याचं दिसत आहे.


जनजागृतीसाठी व्हिडीओ शेअर

'सर्वात साहसी सेल्फीचा प्रयत्न की एक बेजबाबदार पाऊल ?’असं लिहून मुंबई पोलिसांनी हा व्हिडिओ ट्विट केला आहे. तसंच, एका सेल्फीसाठी स्वतःच्या जीवाशी खेळू नका असं आवाहन सुद्धा केले आहे. जीव वाचवा, अशी जोखीम घेऊ नका असे सांगत जनजागृतीसाठी मुंबई पोलिसांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे.



सेल्फीच्या मोहापायी मृत्यू

मुंबई पोलिसांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये एक तरूण एका उंच इमारतीच्या गच्चीवर उभा आहे. गच्चीच्या कठड्यावर उभा राहून तो सेल्फी घेण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याचवेळी हा तरूण तोल गेल्यानं कोसळतो आणि खाली पडतो. असं या व्हिडिओत दिसतेच आहे. तसंच, यामध्ये त्या तरुणाचा मृत्यू झाल्याचं देखील स्पष्ट होतं आहे. त्यामुळं एका सेल्फीच्या मोहापायी असे स्टंट करू नका असं आवाहन मुंबई पोलिसांनी केलं आहे.



हेही वाचा -

'त्या' मोटरमनचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू

अभिनेते अमिताभ बच्चन आणि उद्योजक के. व्ही. सत्यमूर्ती यांच्या बंगल्याला नोटीस



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा