Advertisement

आरेतली हिरवळ वाढणार!


आरेतली हिरवळ वाढणार!
SHARES

आरे कॉलनीतील मोकळ्या जागेवरील अतिक्रमण रोखण्यासाठी तेथे झाडांची लागवड करण्याचा निर्णय आरे मिल्क कॉलनीने घेतल्याची माहिती आरे मिल्क कॉलनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी नथ्थू राठोड यांनी दिली आहे. त्यामुळे आरेत वृक्ष लागवडीसाठी जी संस्था परवानगी मागत आहे, त्यांना वृक्ष लागवडीसाठी परवानगी दिली जात आहे. त्यामुळेच केवळ चार दिवसांत आरेत तब्बल दीड हजार झाडांची लागवड करण्यात आली असल्याचेही राठोड यांनी सांगितले आहे. मात्र यामुळे राखीव जागेवर होणाऱ्या झाडांच्या अतिक्रमणाचं काय, असा प्रश्न मात्र अनुत्तरीत राहिला.

मुंबईची फुफ्फुसं अशी ओळख असलेल्या आरेत अतिक्रमणाची समस्या मोठी आहे. त्यातच मेट्रो-3 च्या कारशेडसाठी मोठ्या प्रमाणावर झाडांची कत्तल होणार आहे. त्यामुळे आरेतील पर्यावरणाचा ऱ्हास होणार असल्याचा दावा पर्यावरणवाद्यांकडून केला जात आहे. असे असताना आरे मिल्क कॉलनीने आरेत हिरवळ वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सेव्ह आरे ग्रुपने आरे मिल्क कॉलनीच्या या दुटप्पी धोरणाबाबत आश्चर्य व्यक्त केले आहे. पण तरीही झाडांची लागवड केली जात असेल तर, ही चांगलीच बाब असल्याचेही स्पष्ट केले आहे. आरेतील अतिक्रमण रोखण्यासाठी आणि आरेतील हिरवळ वाढवण्यासाठी झाडांची लागवड करण्यात आल्याचे राठोड यांनी स्पष्ट केले आहे.

सेवाभावी संस्था आणि पर्यावरणवाद्यांच्या ग्रुपद्वारे ही लावगड केली जाणार आहे. त्यानुसार मागील चार दिवसांत दीड हजार झाडांची लागवड करण्यात आली आहे. यापुढे जी कोणी संस्था झाडांच्या लागवडीसाठी पुढे येईल, त्यांना यासाठी परवानगी देण्यात येईल, असेही राठोड यांनी सांगितले आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा