डिसेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळं मुंबईतील तापमानात घट झाली आहे. मुंबईतील तापमान ९ अंशानं घटून २४.८ अंशावरवर आलं आहे. यापूर्वी मुंबईतील तापमान ३३.३ अंश नोदवण्यात आले होते.
सोबतच मुंबईत डिसेंबरमधील २४ तासातील सर्वाधिक दुसऱ्या क्रमांकाच्या पावसाची नोंद देखील झाली आहे. बुधवारी बारा तासात सांताक्रुझ इथल्या पर्जन्यमापकात ४१.६ मिमी पावसाची नोंद झाली. तर, कुलाबा इथल्या पर्जन्यमापकात ४३.२ मिमी पावसाची नोंद झाली.
दरम्यान राज्यात पुढील २४ तासात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असल्यान हवामान विभागानं वर्तवली आहे. यामुळे मच्छीमारांनी समुद्रात मासेमारी करण्यासाठी जाऊ नये, असा इशारा प्रादेशिक हवामान केंद्राच्या अधिकारी शुभांगी भुते यांनी दिला आहे.
अरबी समुद्रात वेगवान वारे सुटले असून त्याचा वेग वाढत असल्यानं मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असं सांगण्यात आलं आहे.
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणावर होत आहे. मुंबई मध्ये पहाटेच्या वेळी पावसाची रिपरिप अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. हवामान खात्यानं मुंबईमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण पूर्व अरबी समुद्र आणि मालदीव लक्ष्यदिवच्या परिसरात चक्रीवादळ मुळे पाऊस पडत आहे.
हेही वाचा