Advertisement

अगरबत्ती व्यवसायाला उतरती कळा, दर्जाहीन अगरबत्तींची चलती

सुगंधी अगरबत्तीच्या उत्पादनात भारत अग्रेसर आहे. जीएसटी आणि नोटबंदीचा फटका व्यावसायिकांना बसल्याचा परिणाम अगरबत्ती उत्पादनावर दिसून आला. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात सुगंधी अगरबत्तीच्या उत्पादनात मोठी घट पहायला मिळाली आहे.

अगरबत्ती व्यवसायाला उतरती कळा, दर्जाहीन अगरबत्तींची चलती
SHARES

वातावरणात प्रसन्नता आणण्यासाठी सुगंधी अगरबत्तीचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. देवधर्माच्या कार्यात अगरबत्तीला मोठं स्थान आहे. मात्र नोटबंदी आणि जीएसटीच्या फटक्यामुळे भारतातील अगरबत्तीचा व्यवसायिकांनी मान टाकण्यास सुरूवात केली आहे. यामुळे चीन, व्हिएतनाम, इंडोनेशिया या सारख्या देशांमधून मोठ्या प्रमाणात सुगंधी अगरबत्तीची आयात वाढली आहे.

सुगंधी अगरबत्तीच्या उत्पादनात भारत अग्रेसर  आहे. जीएसटी आणि नोटबंदीचा फटका व्यावसायिकांना बसल्याचा परिणाम अगरबत्ती उत्पादनावर  दिसून आला. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात सुगंधी अगरबत्तीच्या उत्पादनात मोठी घट पहायला मिळाली आहे. सुगंधी अगरबत्तीसाठी लागणारे साहित्य पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने या साहित्याची परदेशातून आयात करावी लागत आहे. त्यामुळे भारतातील हा व्यवसाय डबघाईला आला. अगरबत्तीसाठी लागणारा कच्चा माल चीन, व्हिएतनाम, इंडोनेशियातून आयात केला जाऊ लागला. या मालावर विविध कर आकारले जातात. त्यामुळे अगरबत्तीच्या किमतीत १० पटीने वाढ झाली आहे.

सुगंधी अगरबत्ती बंगळूरुमधून संपूर्ण भारतात पोहोचायची. बंगळूरुमधील वाढत्या औद्योगिकीकरणामुळे तेथे इलेक्ट्रॉनिक व्यवसायाने जम बसवला. त्यामुळे अगरबत्ती व्यवसायाला उतरती कळा लागली. बिहारमध्ये या उद्योगाला प्रोत्साहन दिले. यामुळे तेथील बेकार कामगारांना या उद्योगातून रोजगार मिळाल्याने बिहार हे अगरबत्ती उद्योगातील अग्रेसर राज्य झाले. नोटबंदीनंतर बिहारला या व्यवसायात फारसा जम बसवता आला नाही. त्यामुळे बिहारमधून बाजारात २० टक्के दर्जाहीन अगरबत्त्या पोहोचत आहेत. दर्जाहीन अगरबत्त्यांच्या वापरामुळे श्वसनक्रियेवर घातक परिणाम होऊ शकतो. महाराष्ट्रात या उद्योगाबाबत उदासीनता आहे. वाढत्या महागाईमुळे दोन वर्षात निम्म्या उद्योजकांनी अगरबत्ती उद्योगाला रामराम ठोकला. या व्यवसायात स्वदेशी उत्पादनाला चालना देण्यासाठी भारत सरकारने आता परदेशातून येणारा कच्चा माल, अगरबत्ती व अन्य सुगंधी वस्तूंच्या आयातीचे नियम सक्त केले आहेत.

चीन व व्हिएतनाम या सारख्या देशांमधून मोठ्या प्रमाणात आयात वाढली असल्याचे सरकारने काही दिवसांपूर्वी म्हटलं. देशांतर्गत उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी या निर्बंधांची गरज असल्याचे सरकारने स्पष्ट केले असले, तरी या गोष्टी अंमलात आणण्यासाठी फार वेळ लागण्याची शक्यता आहे. नुकतेच परकीय व्यापार महासंचालनालयाने (डीजीएफ) एक परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार अगरबत्ती व सुगंधी उत्पादनांच्या आयातीच्या नियमांमध्ये अनेक बदल केले गेले आहेत. या नियमांनुसार रूम फ्रेशनर व सुगंधी उत्पादने तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सामानांवरही निर्बंध आले आहेत. या परिपत्रकातील माहितीनुसार गेल्या वर्षभरात अगरबत्ती व अन्य सुगंधी उत्पादनांची आयात दुप्पट झाली. २०१७-१८ मध्ये ८४.९५ दशलक्ष डॉलरची उत्पादने आयात केली गेली होती, तर २०१८-१९ मध्ये आयात ८३.५९ दशलक्ष डॉलर इतकी होती. चालू आर्थिक वर्षामध्ये पहिल्या तिमाहीत १७.७५ दशलक्ष डॉलर इतक्या किमतीची अगरबत्ती व सुगंधीत उत्पादने आयात झाली आहेत. 



हेही वाचा -

नवी मुंबईतील ओएनजीसीच्या प्रकल्पातून रसायन गळती




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा