कोरोनामुळे देशभर लॉकडाऊन आहे. या लॉकडाऊनमुळे संपूर्ण देश ठप्प होऊन अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र, लाॅकडाऊनचा एक मोठा फायदाही झाला आहे. राज्यातील मोठ्या आणि प्रदूषित शहरांच्या हवेची गुणवत्ता मागील काही दिवसांत सुधारल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे मुंबई, पुणे, ठाणे, चंद्रपूर, सोलापूर आणि नागपूर या शहरांमधील नागरिकांना सध्या स्वच्छ हवा मिळत आहे. ते शुद्ध हवेतून श्वासोच्छवास घेत आहेत.
पुणे आणि ठाण्याने हवा बदलात पहिलं स्थान पटकावलं आहे. या शहरांची हवा मध्यमवरुन उत्तम झाली आहे. तर ऐरोली हे एकमेव ठिकाण आहे, ज्याची हवा उत्तमवरुन समाधानकारक झाली आहे. लॉकडाऊनमुळे जगभरात हवेची गुणवत्ता सुधारल्याचं पाहायला मिळत आहे. निरभ्र आकाश, आवाज कमी पातळी, पक्ष्यांचा चिवचिवाट आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हलकी हवा यामुळे प्रदूषण कमी झाल्याचा दाखला मिळत आहे.
शहर 1 एप्रिलची हवा 1 महिना आधीची हवा गुणवत्ता
चंद्रपूर 62 93 समाधानकारक
मुंबई कुलाबा 69 100 समाधानकारक
मुंबई सांताक्रूझ 54 149 समाधानकारक
नागपूर 71 73 समाधानकारक
नाशिक 67 87 समाधानकारक
नवी मुंबई, नेरुळ 101 147 मध्यम
ऐरोली 101 94 समाधानकारक
पुणे 49 100 उत्तम
सोलापूर 61 80 समाधानकारक
ठाणे 41 110 उत्तम
प्रदूषण नियंत्रण बोर्डाने हे मानांकन केलं आहे. जेव्हा हवेची गुणवत्ता ही मध्यम असते तेव्हा फुफ्फुस, अस्थमा आणि हृदयविकार असणाऱ्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो. जेव्हा हवेची गुणवत्ता समाधानकारक असते, तेव्हा अत्यंत संवेदनशील लोकांना श्वास घेण्यास थोडासा त्रास होऊ शकतो. मात्र हवेची गुणवत्ता उत्तम असली तर असा कुठला ही त्रास उद्भवत नाही.
हेही वाचा