बी वॉर्ड परिसरात वृक्ष लागवडीवर एएलएमची बैठक

Mumbai
बी वॉर्ड परिसरात वृक्ष लागवडीवर एएलएमची बैठक
बी वॉर्ड परिसरात वृक्ष लागवडीवर एएलएमची बैठक
See all
मुंबई  -  

मुंबईला सुंदर आणि स्वच्छ करण्यासाठी पालिकेने सन 1998 मध्ये अॅडव्हान्स लोकॅलिटी मॅनेजमेंट(एलएमएम) ची स्थापना केली. स्थानिक आणि मनपा अधिकारी यांच्या सहभागातून आपल्या विभागात विकास करण्यासाठी ही संकल्पना सुरू करण्यात आली होती. याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी मुंबईच्या मनपा बी वॉर्ड विभागात एएलएमची मिटींग पार पडली. यावेळी सहाय्यक आयुक्त उदयकुमार शिरुळकर यांच्यासोबत स्थानिकांनी स्वच्छतेबाबत चर्चा केली.

मीटिंगमध्ये चर्चा झालेले विषय -

  • बेकायदेशीर पार्किंग
  • आग लागल्यास होणारा पार्किंगचा त्रास यामुळे लवकरच फायर मॉक ड्रिल केले जाणार
  • रमजान महिन्यातील खाद्य पदार्थाच्या स्टॉल्सवर मर्यादा आणि अंकुश
  • परिसर हरित करण्यावर चर्चा
  • ज्याचा वाढदिवस असेल त्याने परिसरात एक तरी झाड लावणे

यासर्व मुद्द्यावर चर्चा झाली असून, लवकरच त्याची अंमलबजावणी होईल असा विश्वास बी वॉर्डचे सहाय्यक आयुक्त उदयकुमार शिरुरकर यांनी व्यक्त केला आहे.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.