Advertisement

विमान तिकीटांची किंमत वाढू शकते, 'हे' आहे कारण

नवीन आर्थिक वर्षांच्या पहिल्याच दिवशी महागाईचा आणखी एक झटका बसला आहे.

विमान तिकीटांची किंमत वाढू शकते, 'हे' आहे कारण
SHARES

नवीन आर्थिक वर्षांच्या पहिल्याच दिवशी महागाईचा आणखी एक झटका बसला आहे. विमान इंधनाच्या (Jet Fuel) दरात वाढ करण्यात आली आहे. विमानाचे इंधन एटीएफचे (ATF) दर दोन टक्क्यांनी वाढवण्यात आले आहेत.

शुक्रवारी जाहीर करण्यात आलेल्या दरानुसार एटीएफचे भाव १,१२,९२५ किलोलीटरवर पोहोचले आहेत. भाववाढीपूर्वी एटीएफचे दर १,१०,६६६ रुपये किलोलीटर होते. नवे दर येत्या १५ एप्रिल २०२२ पर्यंत लागू राहणार आहेत. गेल्या वर्षभरात सातव्यांदा एटीएफच्या दरात वाढ करण्यात आली आहे.

एटीएफमध्ये होत असलेली ही वाढ पाहाता विमान कंपन्या देखील तिकीट वाढू शकतात असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. कोरोना काळात विमान सेवा ठप्प असल्याने आधीच मोठा फटका विमान कंपन्यांना बसला आहे. आता इंधनाचे दर वाढल्यानं त्यात आणखी भर पडली आहे.

दुसरीकडे पेट्रोल, डिझेलचे भाव तब्बल दहा दिवसांनंतर आज स्थिर आहेत. पेट्रोल, डिझेलच्या (Petrol-Diesel Price) भावात आज कोणतीही वाढ करण्यात आली नसल्यानं सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या दहा दिवसांत पेट्रोलचे दर तब्बल ६.८४ पैशांनी वाढले आहेत.

आयओसीएलनं दिलेल्या माहितीनुसार आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. नव्या दरानुसार राजधानी दिल्लीमध्ये आज पेट्रोलचा दर प्रति लिटर १०१.८१ रुपये आहे. तर डिझेलचा भाव ९३.०७ रुपये प्रति लिटर आहे. मुंबईत पेट्रोलचा भाव प्रति लिटर ११६.७२ रुपये आहे. तर डिझेल १००.९४ रुपये प्रति लिटर विकले जात आहे.हेही वाचा

मुंबई मेट्रो २A आणि ७ची स्थानकं, भाडे, वेळापत्रक जाणून घ्या

लोकल प्रवासासाठी लसीकरणाचे दोन डोस आवश्यक नाही, पण...

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा