ऋषी कपूर यांना पालिकेकडून नोटीस

 Pali Hill
ऋषी कपूर यांना पालिकेकडून नोटीस

वडाच्या झाडाच्या फांद्या परवानगीपेक्षा जास्त छाटल्याने अभिनेता ऋषी कपूर यांना पालिकेने कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. वांद्र्यातल्या पाली हिल्स येथील कृष्णाराज या त्यांच्या बंगल्यासमोर असलेल्या वडाच्या झाडाच्या फांद्या कापल्याने पालिकेने त्यांना ही नोटीस पाठवली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार इमारतीच्या बांधकामात अडचण येत असल्याने ऋषी कपूर यांना झाडाच्या फांद्या छाटण्यासाठी पालिकेकडे परवानगी मागितली होती. तेव्हा झाडाच्या फक्त सहा फांद्या छाटण्याची परवानगी पालिकेने दिली होती. मात्र पालिकेच्या निरीक्षणानंतर झाडाच्या सहा जास्त फांद्या कापल्याचे निदर्शनास आले. सहा फांद्या छाटण्याची परवानगी असताना चुकीच्या पद्धतीने झाडांच्या अतिरिक्त फांद्या का छाटल्या, असा प्रश्न करत पालिकेने ऋषी कपूर यांना बुधवारी नोटीस पाठवली असून 24 तासात उत्तर देण्यास सांगितले आहे.

Loading Comments