Advertisement

प्रदूषणमुक्त मुंबईसाठी महापालिका अधिकाऱ्यांना देणार इलेक्ट्रिक वाहनं

मुंबईसह आसपासच्या परिसरातील वाढणारे प्रदुषण कमी करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहेत.

प्रदूषणमुक्त मुंबईसाठी महापालिका अधिकाऱ्यांना देणार इलेक्ट्रिक वाहनं
SHARES

मुंबईसह आसपासच्या परिसरातील वाढणारे प्रदुषण कमी करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. त्यानुसार, वेगवेगळे उपक्रम राबावले जात आहेत. अशातच वाहनांमधून येणाऱ्या धुरामुळंही प्रदुषण वाढत असल्यानं आता इलेक्ट्रीक गाड्यांची मागणी वाढली आहे. त्यामुळं मुंबई महापालिकेनं ही प्रदूषणमुक्त मुंबईसाठी आता अधिकाऱ्यांसाठीही इलेक्ट्रिक गाड्या घेण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांच्या चार्जिंगसाठी मुंबईत काही ठिकाणी चार्जिंग पॉईंटही सुरू करण्यात येणार आहेत.

या उपक्रमाचा प्रारंभ १५ ऑगस्टपासून करण्याचा महापालिकेचा मानस आहे. मुंबईतील प्रदूषणाचं प्रमाण गेल्या काही वर्षांमध्ये वाढलं आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी बेस्ट उपक्रमानं यापूर्वीच इलेक्ट्रिक बसगाड्या घेण्यास सुरुवात केली आहे. त्यानंतर आता महापालिकेनं प्रदूषणमुक्त मुंबईसाठी इलेक्ट्रिक गाड्या घेण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

महापौर, आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, विविध समितीचे अध्यक्ष, गटनेते, अधिकारी यांना त्यांच्या कार्यकाळात महापालिकेमार्फत शासकीय वाहन दिले जाते. अशी सुमारे २०० वाहनं घेण्यात येतात. तसंच, माल वाहतुकीसाठी हलकी व अवजड मालवाहक वाहनंही वापरली जातात. मात्र, प्रदूषण रोखण्यासाठी आता ही पारंपरिक इंधनाची वाहने कमी करून इलेक्ट्रिक प्रकारची वाहनं टप्प्याटप्प्यानं घेण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे.हेही वाचा -

कोरोना निर्बंधांची आडकाठी फक्त महाराष्ट्रातच का?- राज ठाकरे

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा