Advertisement

अफरोज शाह यांच्या एका ट्वीटनं यंत्रणा हलली, वर्सोवा बीचवरचे कचऱ्याचे ढीग सफाचट!


अफरोज शाह यांच्या एका ट्वीटनं यंत्रणा हलली, वर्सोवा बीचवरचे कचऱ्याचे ढीग सफाचट!
SHARES

गावगुंडांनी शिवीगाळ आणि धमकी दिल्यामुळे स्वच्छता दूत अफरोज शाह यांनी क्लिनअप ड्राइव्ह थांबवली होती. १൦९ आठवड्यांपासून सुरू असलेलं वर्सोवा क्लिनअप ड्राइव्ह थांबवत असल्याचं अफोरज यांनी ट्वीटरवर जाहीर केलं. पण यानंतर सोशल मीडियावर मुंबईकरांचा अफरोजला जबरदस्त पाठिंबा मिळतोय. ट्विटर आणि फेसबुकवर अनेकांनी पोस्ट शेअर करत आपला संताप व्यक्त केला आहे.


अफरोज शाह यांच्या ट्विटची दखल केंद्रीय नगर विकासमंत्री हरदीप सिंग पुरी यांनी देखील घेतली आहे. हरदीप यांनी ट्वीट करत म्हटलं की, तुला आणि तुझ्या स्वयंसेवकांना धमकी आणि शिवीगाळ केल्याचं कळल्यापासून मी चिंतेत आहे. या घटनेची सर्व माहिती मी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवली आहे. मुख्यमंत्री कार्यालयानं या प्रकरणाची दखल घेत मुंबई पोलीस आणि महापालिकेला लागेल ती मदत करण्यास सांगितलं आहे. त्यामुळे तू अशी हार मानू नको आणि तुझा लढा असाच सुरू ठेव. आम्ही सर्व तुझ्या पाठिशी आहोत.

मुख्यमंत्री कार्यालयाने आदेश दिल्यानंतर महापालिका कामाला लागली. गेल्या पाच महिन्यांपासून वर्सोवा बीचवर साचलेला कचऱ्याचा ढीग अखेर उचलण्यात आला आहे. मंगळवारी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी साचलेला कचरा साफ केला आहे. दरम्यान, मुंबईकरांनी दिलेल्या या पाठिंब्यानंतर क्लिनअप ड्राइव्ह पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.

आमदार भारती लव्हेकर यांनी देखील याप्रकरणात लक्ष घातलं. भारती यांनी अफरोज शाह आणि पालिका अधिकाऱ्यांची बैठक देखील बोलावली होती. लवकरच बीचवर साचलेला कचरा साफ करण्यात येईल, असं आश्वासन भारती यांनी दिलं होतं. त्यानुसार दर आठवड्याला कचरा उचलण्यात येणार आहे, असे आदेश पालिका अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

२൦१५ पासून अफरोज शहानं वर्सोवा बिच क्लिनअपला सुरुवात केली. गेल्या २ वर्षांत अफरोज यांनी वर्सोवा बीचचा कायापालट केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्वीट करत अफरोज शाह यांचं कौतुक केलं होतं. अफरोज यांच्या कामाची दखल घेत संयुक्त राष्ट्रानं त्यांचा गौरव देखील केला होता. गेल्या २ वर्षांमध्ये अफरोज यांनी वर्सोवा बीचचा २.७ किलोमीटर परिसर स्वच्छ करून जवळपास ५ मिलियन किलो कचरा बाहेर काढला आहे.




हेही वाचा

वर्सोवा बीचचा कायापालट करणाऱ्या अफरोज शाहला गुंडांकडून धमकी


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा