Advertisement

वर्सोवा बीचचा कायापालट करणाऱ्या अफरोज शाहला गुंडांकडून धमकी


वर्सोवा बीचचा कायापालट करणाऱ्या अफरोज शाहला गुंडांकडून धमकी
SHARES

मुंबईतल्या वर्सोवा बीचवर दर रविवारी स्वच्छता अभियान राबवणारे स्वच्छता दूत अफरोज शाह यांना गुंडांनी धमकवल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे १൦९ आठवड्यांपासून सुरू असलेली वर्सोवा बीच क्लिन-अप मोहीम अफरोज शाह यांनी थांबवलं आहे. अफरोजनं ट्वीट करत क्लिनअप ड्राइव्ह थांबवत असल्याची माहिती दिली.


अफरोजनं ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, '१൦९ आठवड्यांपासून सुरू असलेलं क्लिनअप ड्राइव्ह मी थांबवत आहे. याचं कारण की काही गुंडांकडून वारंवार धमक्या दिल्या जात आहेत. महापालिकेकडून कचराही उचलला जात नाही. गोळा केलेला कचरा तसाच पडून राहतो. या सगळ्यांना कंटाळून ही स्वच्छता मोहीम मी थांबवत आहे. मी खूप प्रयत्न केला. पण मला अपयश आलं आहे. यासाठी मी माझ्या देशाची माफी मागतो.'

अफरोज आणि त्यांच्या स्वयंसेवकांना तीन -चार गुंडांकडून धमकी दिली जात आहे. शिवाय महापालिकेकडून कचरा उचलला जात नाही. त्यामुळे कचऱ्याचा ढीग जमा होत असल्याचा अफरोज यांचा आरोप आहे. पण महापालिकेनं हे आरोप फेटाळून लावले आहेत. महापालिकेनुसार, अफरोज आणि त्यांच्या स्वयंसेवकांकडून जमा केलेल्या कचऱ्यात वाळू आहे. कचऱ्यातून वाळू काढली जात नाही, तोपर्यंत कचरा उचलता येत नाही. यासाठी आम्ही काही कामगार ठेवले आहेत. पण हे काम करण्यात खूप वेळ जातोय, असं उत्तर देत पालिका अधिकाऱ्यांनी आरोप फेटाळून लावले आहे.



आमदार भारती लव्हेकर यांनी याप्रकरणात लक्ष घातलं आहे. भारती यांनी अफरोज शाह आणि पालिका अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. लवकरच बीचवर साचलेला कचरा साफ करण्यात येईल, असं आश्वासन भारती यांनी दिलं आहे. शिवाय भारती यांनी स्थानिक पातळीवर म्हणजेच गावात बैठक बोलावली आहे. यासंदर्भात स्थानिकांशी चर्चा करून समस्येवर तोडगा काढू, असं आश्वासनही भारती यांनी दिलं आहे.

२൦१५ पासून अफरोज शाहनं वर्सोवा बीच क्लिनअपला सुरुवात केली. गेल्या २ वर्षांमध्ये अफरोजनं वर्सोवा बीचचा कायापालट केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्वीट करत अफरोज शाहचं कौतुक केलं. अफरोजच्या कामाची दखल घेत संयुक्त राष्ट्रानं अफरोजचा गौरवही केला. गेल्या २ वर्षांमध्ये अफरोजनं वर्सोवा बीचचा २.७ किलोमीटर परिसर स्वच्छ करून जवळपास 50 लाख किलो कचरा बाहेर काढला आहे.



हेही वाचा

माहीममध्ये स्वातंत्र्यदिनाचं अनोखं सेलिब्रेशन!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा