Advertisement

जागतिक वसुंधरा दिनी कसं कराल पृथ्वीचं संरक्षण


जागतिक वसुंधरा दिनी कसं कराल पृथ्वीचं संरक्षण
SHARES

दरवर्षी 22 एप्रिल हा दिवस जागतिक वसुंधरा दिन म्हणुन साजरा करण्यात येतो. वसुंंधरेचं संरक्षण करण्यात पर्यावरणाचा मोठा वाटा आहे. या पृथ्वीशी प्रत्येकाचं जीवन जोडलं गेलंय. आज मोठ्या प्रमाणात वृक्षतोड, जंगलतोड केली जात असल्याने पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. त्याला जबाबदारही आपणच आहोत. याकडे वेळीच लक्ष दिलं नाही तर, त्याचे परिणाम फार वाईट असतील. त्यासाठी पर्यावरणाची काळजी घेणे, आपला परिसर स्वच्छ ठेवणे, वृक्ष तोडणी न करता वृक्षलागवड करणे, झाडांची देखभाल केल्यास पर्यावरणाचं संरक्षण होईल. त्यामुळे पर्यावरणाची काळजी घेतल्यास पृथ्वीचं देखील संरक्षण होईल आणि मोठा दुष्परिणाम टळेल.

काय आहे वसुंधरा दिन ( वर्ल्ड अर्थ डे)

अमेरिकेचे सीनेट सदस्य जेराल्ड नेल्सन यांनी सन 1970 मध्ये पहिल्यांदा पर्यावरण दिनाची संकल्पना अंमलात आणली होती. त्यानंतर 192 हून अधिक देशांमध्ये हा दिन जागतिक वसुंधरा दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला. खरंतर पर्यावरण आणि पृथ्वीचं संरक्षण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

संपूर्ण जगात एका वर्षात 15 कोटी वृक्षांची तोडणी होते. ज्यामुळे जागतिक स्तरावर तापमान वाढीचं संकट वाढलं आहे. लाकडांचा अनधिकृतरित्या व्यवसाय करणे, माशांचा अनधिकृत व्यवसाय करणे, घातक कचऱ्याचा अनधिकृतरित्या होणारा व्यवसाय, जंगली जिवांची शिकार करणे, यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो आणि पर्यावरणाचा ऱ्हास करणे हा अपराध आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा