Advertisement

८०० वर्षांनंतर 'या' दिवशी होणार ‘ख्रिसमस स्टार’चं दर्शन

तब्बल ८०० वर्षानंतर २१ डिसेंबर रोजी सूर्यास्तानंतर ‘ख्रिसमस स्टार’चं दर्शन अवकाशात होणार आहे.

८०० वर्षांनंतर 'या' दिवशी होणार ‘ख्रिसमस स्टार’चं दर्शन
SHARES

तब्बल ८०० वर्षानंतर २१ डिसेंबर रोजी सूर्यास्तानंतर ‘ख्रिसमस स्टार’चं दर्शन अवकाशात होणार आहे. गुरू आणि शनी हे दोन ग्रह एका रेषेत आल्यानं आकाशात एक दुहेरी चांदणी दिसणार आहे. या दुर्मिळ खगोलीय स्थितीमुळे आकाशात दिसणाऱ्या दुहेरी चांदणीला ‘ख्रिसमस स्टार किंवा ‘स्टार ऑफ बेथलेम असं म्हटलं जातं.

उन्हाळ्याच्या सुरुवातीपासूनच हे दोन्ही ग्रह एकमेकांच्या दिशेनं सरकण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, २१ तारखेच्या रात्री ते एकमेकांसमोर येतील. त्यामुळे दोन्ही ग्रह एकाच मोठ्या ताऱ्यासारखे दिसतील. त्यांचा आकार पौर्णिमेच्या पूर्णाकृती चंद्राच्या १/५ असेल, अशी माहिती ह्युस्टनच्या राईस विद्यापीठातील भौतिकशास्त्र आणि खगोलशास्त्राचे प्राध्यापक पॅट्रीक हार्टिगन यांनी सांगितली.

ही स्थिती या आधी ८०० वर्षांपूर्वी ४ मार्च १२२६ रोजी आकाशात पाहावयास मिळाली होती. या वर्षी ‘ख्रिसमस स्टार पाहण्याची संधी हुकली तर त्यासाठी १५ मार्च २०८० या दिवसापर्यंत वाट पाहावी लागेल, असेही प्रा. हार्टिगन यांनी सांगितलं.



हेही वाचा

मुंबईतल्या ४ कंपन्यांना प्रदूषण विभागाची नोटीस

राज्यातील १० नवीन संवर्धन राखीव क्षेत्रांना मान्यता

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा