पालिका उद्यान स्पर्धेत 'मरे'ची बाजी

 Pali Hill
पालिका उद्यान स्पर्धेत 'मरे'ची बाजी
पालिका उद्यान स्पर्धेत 'मरे'ची बाजी
पालिका उद्यान स्पर्धेत 'मरे'ची बाजी
See all

मुंबई - महापालिकेकडून राणीबागमध्ये तीन दिवसांचं 22 वं उद्यान विषयक प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं. या प्रदर्शनात जवळपास दीड लाख नागरिकांनी उपस्थिती लावली. प्रदर्शनादरम्यान महापालिकेच्या उद्यान खात्याद्वारे एकूण 22 गटांमध्ये उद्यान विषयक स्पर्धादेखील आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत सर्व गटात सर्वाधिक गुण मिळवून मध्य रेल्वेने स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. तर, पश्चिम रेल्वेने दुसरा क्रमांक पटकावला.

महापालिकेच्या उद्यान खात्याचे उपायुक्त डॉ. किशोर क्षीरसागर यांच्या हस्ते मध्य रेल्वेच्या उद्यान विभागाचे अधीक्षक थोरात यांना, तर पश्चिम रेल्वेच्या उद्यान विभागाचे वरिष्ठ अभियंता नरेशकुमार चतुर्वेदी यांना प्रातिनिधीक स्वरुपात सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन सत्कार केला, अशी माहिती उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे. प्रदर्शनादरम्यान विविध गटांमध्ये उद्यान विषयक स्पर्धा देखील आयोजित करण्यात येत असते. हे गट प्रामुख्याने 'इनडोअर' आणि 'आऊट डोअर' अशा दोन विभागात विभागलेले असतात. तर 'आऊट डोअर' विभागात वृक्ष संवर्धन, खाजगी उद्याने, खाजगी संस्थांद्वारे देखरेख करण्यात येणारी वाहतूक बेटे आणि रस्ते दुभाजक, पोडियम उद्याने, टेरेस गार्डन, लॅण्डस्केप गार्डन, व्हर्टिकल गार्डन आदी गटांचा समावेश होता ..

खाजगी आणि शासकीय संस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविलेल्या या स्पर्धेत 16 मुख्य गट आणि 6 उपगट होते. यानुसार सर्व 22 गटांमध्ये पहिले आणि दुसरे पारितोषिक याप्रमाणे 44 पारितोषिकांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

Loading Comments