Advertisement

मुंबईत कावळे, कबुतरांच्या मृत्यूत वाढ

मुंबईत कुठेही पक्षी मृत आढळल्याचं दिसताच पालिकेच्या १९१६ या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन मुंबई महापालिकेने केलं आहे. अनेक मुंबईकरांना पालिकेच्या या आवाहनाला प्रतिसाद दिला आहे.

मुंबईत कावळे, कबुतरांच्या मृत्यूत वाढ
SHARES

मुंबईत कावळे आणि कबुतरांच्या मृत्यूत वाढ झाल्याने बर्ड फ्लूची भीती कायम आहे. बुधवारी सकाळपर्यंत मुंबईत १६९ कावळे, कबुतर मृत्युमुखी पडल्याचं समोर आलं आहे. 

मुंबईत मंगळवारी सकाळी ७ ते बुधवारी सकाळी ७ वाजेपर्यंत १६९ पक्षी मृतावस्थेत आढळले आहेत. रविवार, सोमवारपाठोपाठ मंगळवार, बुधवारीही काही कावळे, कबुतरे मृत पावले आहेत. मुंबईत कुठेही पक्षी मृत आढळल्याचं दिसताच पालिकेच्या १९१६ या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन मुंबई महापालिकेने केलं आहे. अनेक मुंबईकरांना पालिकेच्या या आवाहनाला प्रतिसाद दिला आहे. अनेकांनी मृत पक्षांची माहिती पालिकेच्या आपत्कालीन विभागाच्या १०१६ क्रमांकावर कळविण्यास सुरुवात केली आहे.

मंगळवारी चेंबूर, गोवंडी, प्रभादेवी, वडाळा, माटुंगा, कुलाबा, सायन कांदिवली, बोरीवली, अंधेरी, मालाड, दादर आदी परिसरात कावळे, कबुतरे मृत स्थितीत आढळले होते. त्यात कावळ्यांचे प्रमाण सर्वाधिक होते. या तक्रारीबाबत माहिती देवनार येथील पशुवधगृहात पाठवण्यात आल्याचे पालिका प्रशासनाने म्हटले.



हेही वाचा -

"सीरमसाठी भावनिक क्षण", पुनावाला यांनी शेअर केला टीमसोबत फोटो

‘फिल्मी स्टाईल’ने आरोपी पोलिसांच्या तावडीतून पळाला



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा