Advertisement

'निसर्ग' चक्रीवादळ अलिबाग समुद्र किनाऱ्याला धडकणार

बुधवारी अलिबागमधील समुद्र किनाऱ्यावर चक्रीवादळ धडकणार आहे.

'निसर्ग' चक्रीवादळ अलिबाग समुद्र किनाऱ्याला धडकणार
SHARES

निसर्ग हे चक्रीवादळ बुधवारी सकाळी ११ ते दुपारी १ च्या दरम्यान अलिबागमधील समुद्र किनाऱ्यावर धडकणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर अलिबागमध्ये उद्या सकाळी ७ वाजल्यापासून वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. अलिबागमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट असेल.

दुसरीकडे, ३ जून रोजी येणाऱ्या संभाव्य चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहरातील महसूल आणि अन्य महत्त्वाच्या विभागांनी आपत्कालीन व्यवस्थेसह दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात रेल्वे, बेस्ट, महसूल, आरोग्य आदी महत्त्वाच्या विभागासोबत संभाव्य वादळाच्या पार्श्वभूमीवर बैठक झाली. त्यावेळी त्यांनी उपरोक्त सूचना दिल्या. कोविडच्या प्रादुर्भावाच्या काळात तात्पुरत्या स्वरुपात उभा केलेल्या रुग्णालयातील विद्युत पुरवठा खंडित होणार नाही याची विशेष काळजी घेण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिल्या. संभाव्य वादळानं होणाऱ्या नुकसानीची मोजणी तसेच मदत कार्यासाठी उपजिल्हाधिकारी, तहसिलदार, नायब तहसिलदार यांचे नऊ गट तयार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितलं.

निसर्ग चक्रीवादळच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला फेसबुक लाइव्हद्वारे संबोधित केलं. यावेळी ते म्हणाले की, एकामागून एक संकट येत आहे. कोरोनाच संकट आहेच. निसर्ग आपली परीक्षा घेण्याचं सोडत नाही आहे. या परीक्षेमध्ये ताकदीने सामोरे जाऊन त्यातून बाहेर पडायचं आहे. उद्या आणि परवाचे २ दिवस महत्त्वाचे आहेत. त्यामुळे घराबाहेर पडू नका. या संकटाच्या छाताडावर चाल करून आपल्याला जायचं आहे. या संकटाला धैर्याने सामोरे जाऊया आणि त्यातून सहीसलामत बाहेर पडूया.



हेही वाचा

'निसर्ग' खवळला! जाणून घ्या रेड, ग्रीन, ऑरेंज अलर्टचा अर्थ

दुहेरी संकट

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा