सर्पमित्र जलसंपदामंत्री !

मुंबई - राजकीय कारकीर्दीत अनेक वादांवर नेम धरणारे जलसंपदामंत्री गिरीश महाजन पुन्हा एकदा चर्चेत आलेत. आणि ते चर्चेत आलेत त्यांच्या सर्पप्रेमामुळे...आश्चर्य वाटलं ना? होय..राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन हे सर्पमित्र आहेत. त्यांच्या नुकत्याच व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये त्यांचं हे सर्पप्रेम दिसून येतंय. जामनेरमध्ये एका सर्पमित्रानं एक कोब्रा त्यांना दाखवण्यासाठी आणलेला असतानाचा हा व्हिडिओ आहे. गिरीश महाजन यांच्या हातातला कोब्रा इतरांसाठी धडकी भरवणारा असला, तरी ते स्वत: सर्पमित्र असल्यामुळे त्यांच्यासाठी ही जणू नेहमीचीच गोष्ट होती. महाजन हे लहानपणापासूनच साप पकडण्यात पटाईत असल्याचंही सांगितलं जातंय.

Loading Comments