ग्रेट इस्टर्न लिंक्स सोसायटीची शून्य कचरा प्रकल्पाकडे वाटचाल

Goregaon East
ग्रेट इस्टर्न लिंक्स सोसायटीची शून्य कचरा प्रकल्पाकडे वाटचाल
ग्रेट इस्टर्न लिंक्स सोसायटीची शून्य कचरा प्रकल्पाकडे वाटचाल
See all
मुंबई  -  

गोरेगाव येथील राम मंदिर रोडच्या ग्रेट इस्टर्न लिंक्स या रहिवासी सोसायटीने शून्य कचरा प्रकल्प यशस्वी करुन दाखवला आहे. या प्रकल्पामुळे वर्षभरातल्या कॉलनीतल्या तब्बल 100 टनाहून अधिक कचऱ्याचा बोजा कमी झाला आहे.

घनकचरा व्यवस्थापन आणि शहरातील कचरा कमी करण्यासाठी ग्रेट इस्टर्न लिंक्स या सोसायटीतील रहिवाशांनी पुढाकार घेतला आहे. या माध्यमातून दररोज प्रत्येक घरातून 350 ते 400 ग्रॅम ओला आणि सुका कचरा गोळा केला जातो. त्या सोसायटीत 356 घरे असून प्रत्येक घरात ओला, सुका आणि रिजेक्ट कचऱ्याचे तीन डब्बे ठेवण्यात आले आहेत. ओला कचरा खतनिर्मितीसाठी कंपोस्ट पीटसमध्ये नेला जातो. सुका कचरा पुनर्निर्मितीसाठी 'राम' नावाच्या संस्थेला दिला जातो आणि रिजेक्ट कचरा पालिकेच्या डम्पिंग ग्राऊंडवर पाठवला जातो. सोसायटी परिसरात उभारण्यात आलेल्या 4 पिटसमध्ये हा कचरा रोजच्या रोज ढवळला जातो. त्यानंतर तयार झालेल्या खताला सोसायटीतील मोकळ्या परिसरात ऊन दाखवल्यानंतर क्रशरच्या साहाय्याने ते खत बारीक केले जाते.ग्रेट इस्टर्न लिंक्सचे रहिवासी 'रिव्हर मार्च' या ग्रुपशी जोडले गेले. मुंबईतल्या नद्या वाचवण्यासाठी हा ग्रुप काम करतो. यातूनच विचारांची देवाण घेवाण झाली. त्यातूनच या शून्य कचरा प्रकल्पाची संकल्पना समोर आली. ग्रेट इस्टर्न लिंक्सच्या प्रगत परिसर व्यवस्थापन (एएलएम) च्या सचिव शैलजा नाखरे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. त्यांना सोसायटीतील पल्लवी उपाध्याय, अमेय उपाध्याय आणि सोसायटीच्या सचिव श्वेता मोहंता या त्रिकुटाने जोड दिली. चार महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या या शून्य कचरा प्रकल्पाला या सोसायटीतील सर्वच रहिवाशांनी आणि महापालिका विभागाने उत्तम प्रतिसाद दिला आहे. पहिल्यांदा ओला कचऱ्यातून 20 किलो खत तयार करण्यात आलं. त्याचा वापर सोसायटी परिसरात असलेल्या 400 झाडांच्या लागवडीसाठी करण्यात आला आहे.

अंधेरीतील विजयानगर सोसायटी आणि वांद्रेच्या पूर्णा सोसायटीतही शून्य कचरा प्रकल्प राबवला जात असून त्यांनी आम्हाला प्रोत्साहन आणि प्रशिक्षण दिल्यामुळेच शून्य कचरा प्रकल्प यशस्वी करू शकलो.

- पल्लवी उपाध्याय, सदस्य, ग्रेट इस्टर्न लिंक्स एएलएम

सोसायटीत निर्माल्य आणि ई-कचऱ्याचीही सोय

दररोज देवघरातील निर्माल्य बाहेर फेकले जाऊ नये यासाठी सोसायटी परिसरात निर्माल्य टाकण्याची सोय करण्यात आली आहे. शिवाय घरात होणारा ई-कचराही गोळा करून करून एका खासगी एजन्सीला विकत दिला जातो. तसेच परिसरातील भिंतीवर निसर्ग चित्र रेखाटून परिसरात हिरवळ जपण्याचा प्रयत्न सोसायटीतील चिमुकल्यांनी केला आहे. काँक्रिटिकरणामुळे लुप्त होत असलेल्या चिमण्यांचा वावर देखील आता येथे पाहायला मिळत आहे. त्यासाठी येथे खास घरटे तयार करण्यात आले असून त्यात खाण्या-पिण्याची सोय करण्यात आली आहे.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.