Advertisement

येत्या ३ ते ४ तासात मुंबई आणि उपनगरात मुसळधार पावसाचा इशारा

येत्या ३ ते ४ तासांत मुसळधार पाऊस पडणार असल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे.

येत्या ३ ते ४ तासात मुंबई आणि उपनगरात मुसळधार पावसाचा इशारा
SHARES

मुंबईत शुक्रवारपासून संततधार पाऊस सुरू आहे. पावसाच्या पार्श्वभूमीवर बीएमसीने शहरात आपत्ती व्यवस्थापनासह एनडीआरएफची टीम तैनात केली आहे. येत्या ३ ते ४ तासांत मुसळधार पाऊस पडणार असल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे.

वांद्रे, सांताक्रूझ आणि घाटकोपर आणि नवी मुंबई सारख्या काही भागात लवकरच मुसळधार पाऊस पडू शकतो. काही वेळानंतर अंधेरी, भांडुप आणि वसई विरारमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये आणि नजिकच्या शहरांमध्ये पुढच्या ३-४ तासांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

मुंबईत पुढील 5 दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी  करण्यात आला आहे. आज काही ठिकाणी 200 मिमीहून अधिक पावसाचा अंदाज आहे. 

7 जुलै आणि 8 जुलै रोजी मुंबईत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. 

रायगड, रत्नागिरीत पुढील 4 दिवस अतिवृष्टीची शक्यता, चारही दिवस रेड अलर्ट देण्यात आला आहे. 

मुंबईतही दोन दिवसांत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक रस्त्यांवर पाणी साचलं आहे. मुंबईतील अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत. रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक मंदावली आहे. तर लोकल ट्रेनही अपेक्षित वेळेपेक्षा अर्धा तास उशिराने सुरु आहेत. मुसळधार पावसाचा लोकलच्या तिन्ही मार्गांना मोठा फटका बसला आहे. तर अनेक भागांतील रस्ते हे जलमय झालेले पाहायला मिळत आहेत.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा