'ALM'च्या माध्यमातून लावली आयुर्वेदिक झाडे

Vakola
'ALM'च्या माध्यमातून लावली आयुर्वेदिक झाडे
'ALM'च्या माध्यमातून लावली आयुर्वेदिक झाडे
See all
मुंबई  -  

26 जुलैचा महापुराने, मुंबईला हादरवून सोडलं होतं. खासकरून सांताक्रूझ वाकोला या विभागात पुराचा जास्त परिणाम झाला होता. म्हणूनच वाकोल्यात राहणाऱ्या 44 वर्षीय शिल्पा धारोड यांना त्या दिवसापासून आपल्या विभागात काही तरी सुधार करायचे होते. पण कसा? हा प्रश्न त्यांना पडला. मुंबई महानगर पालिकेच्या माध्यमातून प्रगत परिसर व्यवस्थापन म्हणजे ALM च्या बद्दलची माहिती शिल्पा यांना मिळाली. स्थानिक लोकांच्या मदतीने 23 जुलै 2011 साली वाकोला प्रगत परिसर व्यवस्थापनचा जन्म झाला. या ALM कडे वाकोला जवळचा महामार्ग ते मिलिटरी कॅम्पपर्यंतचा परिसर येतो. ज्यात जवळपास 40 गृहनिर्माण संस्था आणि बऱ्याच झोपडपट्टी वस्तीचा भाग येतो. या विभागात सर्वात मोठी समस्या म्हणजे कचऱ्याची. त्यामुळेच मिठी नदीचा प्रकोप 26 जुलैला पाहायला मिळाला. या विभागाला यावर शिल्पा धारोड यांनी आपल्या स्थानिक लोकांच्या मदतीनं आणि वॉर्ड क्रमांक H ईस्टच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने स्वछता मोहीम राबवली आणि दोन वर्षांच्या प्रयत्नांनंतर बी बाग तयार केली, असे वाकोला प्रगत परिसर व्यवस्थापनच्या सचिव शिल्पा धारोड यांनी 'मुंबई लाइव्ह'ला सांगितले.

ALM च्या माध्यमातून परिसर स्वछ आणि हरित करण्यात येत आहे. खास करून कचऱ्यापासून खत बनवून त्याचा वापर आयुर्वेदिक रोपे लावण्यास होत आहे. हा प्रयोग स्थानिक शाळेच्या आवारात करण्यात आला आहे. स्टेशनकडून महामार्गावर येणाऱ्या स्कायवॉकचे विस्तारीकरण, मिठी नदीवर नवीन पादचारी पूल यंत्रणा बनवून घेणे, हरित जागेची निगा राखणे ही पुढची आव्हने ALM समोर आहेत.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.