​दहिसर नदीचा झाला नाला

दहिसर - कधीकाळी दहिसरची शान अशी ओळख असणाऱ्या दहिसर नदीचं हळूहळू नाल्यात रुपांतर होत आहे. नदीच्या बाजूला मोठ-मोठ्या कंपन्या असल्याकारणाने मोठ्या प्रमाणात नदीत कचरा फेकला जातो. ज्यामुळे परिसरात दुर्गंधी आणि कचऱ्याचं साम्राज्य पसरलं आहे. या नदीच्या भोवती मोठ्या उंचीची भिंत  बांधावी, ज्यामुळे नदीत कचरा फेकला जाणार नाही, अशी मागणी इथल्या स्थानिकांनी केली आहे. अजून काही महिने अशीच परिस्थिती राहिली तर लवकरच या नदीचं नाल्यात रुपांतर होईल अशी नाराजीही स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

Loading Comments