Advertisement

पुढचे ४ ते ५ दिवस पावसाचे, 'या' जिल्ह्यांसाठी येलो अर्टल जारी

पुढील ४ ते ५ दिवस पावसाचा जास्त प्रभाव राहू शकतो, असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे.

पुढचे ४ ते ५ दिवस पावसाचे, 'या' जिल्ह्यांसाठी येलो अर्टल जारी
SHARES

राज्यात येत्या ४ ते ५ दिवसांत पाऊस पुन्हा जोर धरण्याची शक्यता आहे. येत्या ४८ तासात बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. पुढील ४ ते ५ दिवस कोकण, मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये पावसाचा जास्त प्रभाव राहू शकतो.

सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला कोकण विभागातील मुंबई, ठाण्यासह कोकणात काही ठिकाणी पावसाची हजेरी होती. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाला. सध्या कोकण विभाग वगळता इतरत्र पावसाचा जोर ओसरला आहे.

कोकण विभागात पुढील आठवडाभर अनेक ठिकाणी कमी-अधिक प्रमाणात पाऊस असणार आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यानंतर कोकणासह राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

शुक्रवारी मुंबई, रत्नागिरी, अलीबाग, परभणी, चंद्रपूर या भागांत पावसाची नोंद झाली. कोकण विभागात ५ ते ६ सप्टेंबरनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. ७ सप्टेंबरला काही ठिकाणी जोरदार पाऊस आणि किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्रात ६ सप्टेंबरनंतर प्रामुख्याने घाट विभागात पावसाचा जोर राहणार आहे. मराठवाड्यात ५ सप्टेंबरनंतर पावसाचा जोर वाढून अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधारांची शक्यता आहे.हेही वाचा

२०५० पर्यंत दक्षिण मुंबईतील ७० टक्के भाग पाण्याखाली जाण्याची भीती

सिमेंट-काँक्रिटच्या भिंतीमुळे वर्सोवा समुद्रकिनारा नष्ट होईल, पर्यावरणप्रेमींची भीती

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा