Advertisement

अंदाज घेऊनच घराबाहेर पडा, पावसाबाबत IMD चा मुंबईकरांना इशारा

मागील ३ ते ४ तासांमध्ये मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर आणि रायगडमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडलेला आहे. त्यामुळे कार्यालयाकडे जाताना हवामानाचा अंदाज घेऊनच बाहेर पडा, असं आवाहन मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने केलं आहे.

अंदाज घेऊनच घराबाहेर पडा, पावसाबाबत IMD चा मुंबईकरांना इशारा
SHARES

अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ऐन थंडीच्या दिवसांत ढगाळ वातावरण आणि पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. रविवार पाठोपाठ सलग दुसऱ्या दिवशी सोमवारी देखील मुंबई परिसरासह कोकण विभागांत सकाळी तुरळक ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्रात काही भागांत हलक्या पावसाने हजेरी लावली आहे. आणखी एक ते दोन दिवस राज्याच्या बहुतांश भागात ढगाळ हवामानाची स्थिती राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार सोमवार सकाळपासून  मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यात हलका पाऊस पडत आहे. महामार्गांवर ढगाळ वातावरण आणि धुक्यामुळे दृष्यमानता कमी झाली आहे. त्यामुळे वाहने जपून चालवण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे.

हेही वाचा- शनिवार-रविवारच्या पावसाची विक्रमी नोंद, दशकातील दुसरा सर्वाधिक पाऊस

अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अवघ्या काही दिवसांसाठी आलेली थंडी हजेरी लावून पुन्हा लपून बसली आहे. मागच्या ४ ते ५ दिवसांपासून मुंबई शहर-उपनगर आणि आजूबाजूच्या शहरांत ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे. तर काही भागांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊसही पडत आहे. ढगाळ वातावरणामुळे दिवसाच्या कमाल तापमानात घट झाली असली, तरी रात्रीचं किमान तापमान अद्यापही सरासरीच्या पुढेच आहे. त्यामुळे पाऊस पडत असूनही हलका उकाडाही जाणवत आहे. 

MD GFS च्या माॅडेल‌ नुसार,१४ डिसेंबर ला राज्यात, उत्तर महाराष्ट्र व उत्तर मराठवाडाच्या काही भागात कमाल तापमान २४ किंवा त्या पेक्षा खाली जाण्याची शक्यता. मुंबईमध्ये आजच्या मानाने वाढ अपेक्षीत. 

किनारपट्टी भागात ढगांच्या तीव्र हालचाली जाणवत आहेत. मागील ३ ते ४ तासांमध्ये मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर आणि रायगडमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडलेला आहे. त्यामुळे कार्यालयाकडे जाताना हवामानाचा अंदाज घेऊनच बाहेर पडा, असं आवाहन मुंबई प्रादेशिक हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी केलं आहे.  

(IMD mumbai rains update 14th december 2020)

हेही वाचा- ऐन थंडीत मुंबईत पाऊस

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा