Advertisement

पावसाळ्यात मुंबईतील चौपाट्यांवर फायर ब्रिगेडची `फ्लड रेस्क्यू टीम’

गिरगाव, दादर, जुहू, वर्सोवा, अक्सा आणि गोराई अशा चौपाट्यांवर अतिउत्साही आणि बेजबाबदार पर्यटकांमुळे जीवितहानी झाल्याच्या घटना याआधी अनेकदा घडल्या आहेत.

पावसाळ्यात मुंबईतील चौपाट्यांवर फायर ब्रिगेडची `फ्लड रेस्क्यू टीम’
SHARES

दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्यात मुंबईच्या चौपाट्यांवर लाईफ गार्डची टीम असणार आहे. मात्र, यावर्षी लाईफ गार्डच्या मदतीला मुंबई अग्निशमन दलातील `फ्लड रेस्क्यू टीम’चे जवान असणार आहेत. कुठलीही घटना घडल्याचे कळताच `फ्लड रेस्क्यू टीम’ लाईफ गार्डना बॅकअप मिळणार असल्याचे मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख डॉ. प्रभात रंहागदळे यांनी सांगितले. पावसाळ्यात कशाप्रकारे बचावकार्य करायचे याचा अभ्यासही गिरगाव चौपाटीवर `फ्लड रेस्क्यू टीम’ने केला आहे.

 मुंबईच्या चौपाट्यांवर मुंबईकर पावसाचा आनंद घेण्यासाठी गर्दी करतात. मात्र, गिरगाव, दादर, जुहू, वर्सोवा, अक्सा आणि गोराई अशा चौपाट्यांवर अतिउत्साही आणि बेजबाबदार पर्यटकांमुळे जीवितहानी झाल्याच्या घटना याआधी अनेकदा घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर चौपाट्यांवर सुरक्षेसाठी पालिकेच्या माध्यमातून 94 लाइफ गार्ड्स तैनात ठेवण्यात येतात. या लाइफ गार्डकडे बचावकार्यासाठी आवश्यक असणारे सर्व प्रकारची साधने उपलब्ध असतात.

पावसाळ्यात समुद्रात खोल पाण्यात जाऊ नका, असे आवाहन चौपाटय़ांवर तैनात लाईफ गार्ड सतत करत असतात. परंतु लाईफ गार्डच्या सूचनांकडे दुर्लक्ष करत अतिउत्साही पर्यटक खोल पाण्यात जाण्याचा प्रयत्न करतात आणि एखाद्याला आपला जीव गमवावा लागतो. त्यामुळे पावसाळ्यात चौपाच्यांवर एखाद्याचा जीव धोक्यात आलाच तर लाईफ गार्डच्या मदतीला `रेस्क्यू टीम’चे जवान सज्ज असणार आहेत. जेटकीज, सहा रेस्क्यू बोट, सहा कयाक्स, सहा सर्फ बोर्डसह बचावकार्यासाठी आवश्यक असणारी साधनसामग्री तैनात ठेवण्यात येणार असल्याचेही रहांगदळे यांनी सांगितले. 



हेही वाचा -

'या' 5 वॉर्डमध्ये 2 हजाराहून अधिक कोरोना रुग्ण

पालिकेची नवी रणनिती, एका रुग्णाच्या संपर्कातील १५ व्यक्तींचा घेणार शोध




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा