चिमण्या वाचवा!

 Pali Hill
चिमण्या वाचवा!

मुंबई - छोट्या छोट्या चिमण्या वाचवण्यासाठी आता 'स्पैरो शेल्टर' या संस्थेने पुढाकार घेतला आहे. जर तुम्हाला एखादी जखमी चिमणी आढळल्यास तुम्ही त्वरित 986733355 या संस्थेच्या नंबरवर कळवण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष प्रमोद माने यांनी केले आहे. सध्या छोट्या छोट्या चिमण्या दुर्मिळ झाल्या आहेत. त्यातच मकर संक्रात म्हटली की पतंगबाजीला जोर येतो आणि पतंगातील मांजा हा चिमण्यांसाठी घातक ठरल्याचे वारंवार निदर्शनास आले आहे. या मांज्यामध्ये अडकून अनेकदा चिमण्यांना जीव गमवावा लागतो. त्यातच वाढत्या प्रदुषणाचाही हा चिमण्यांवर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे चिमण्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे आता चिमण्या वाचवण्यासाठी सरकार सोबत नागरिकांनीही प्रयत्न केले पाहिजे असं आवाहन 'स्पैरो शेल्टर' या संस्थेने केले.

Loading Comments