Advertisement

ऑक्टोबर हिटच्या चटक्यांनी मुंबईकरांची लाही लाही!

प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार गेल्या २ दिवसापासून वातावरणात कोरडेपणा जाणवत आहे. त्याशिवाय नैऋत्य मोसमी पाऊस महाराष्ट्रातून माघारी परतत असल्यानं वातावरणात अधिक उष्मा जाणवत आहे. पुढील २ दिवसांत तुरळक पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे.

ऑक्टोबर हिटच्या चटक्यांनी मुंबईकरांची लाही लाही!
SHARES

राज्यासोबतच मुंबईतही ऑक्टोबर हिटचा चटका जाणवण्यास सुरूवात झाली आहे. त्यातच सलग ४-५ दिवस मुंबईतील तापमानात वाढ होत असून रविवारी तापामानात कमालीची वाढ झाल्याचं दिसून येत आहे.

मुंबईकरांसाठी रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस... परंतु सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी घराबाहेर निघालेल्या मुंबईकरांची उन्हामुळं अक्षरश: लाही-लाही झाली. रविवारी सांताक्रूझ इथं ३७.२ अंश सेल्सिअस, तर कुलाबा इथं ३६.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलं. वातावरणात वाढलेली आर्द्रता आणि ढगाळलेल्या वातावरणामुळे मुंबईकरांना घामाघूम करून टाकलं.


सर्वात उष्ण दिवस

मुंबईकरांसाठी शनिवारी ६ ऑक्टोबर हा गेल्या २ वर्षांतील सर्वात उष्ण दिवस ठरला. शनिवारी २०१६ पासून ऑक्टोबर महिन्यात नोंदवण्यात आलेलं सर्वोच्च तापमान ठरलं. गेल्यावर्षी २७ ऑक्टोबरला ३६.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली होती.


आर्द्रतेने केलं घामाघूम

दरम्यान रविवारी दुपारीही तापमानात कमालीची वाढ झाली होती. सोबतच हवेतील आर्द्रतेमुळे मुंबईकर हैराण झाले होते. रविवारी कुलाबा इथं ८९ टक्के, तर सांताक्रूझ इथं ७० टक्के आर्द्रता नोंदवण्यात आली. वातावरणात वाढलेली आर्द्रता, वाऱ्याचा आभाव आणि ढगाळलेल्या वातावरणाने मुंबईकरांना घामाघूम करून टाकलं.


वातावरणात कोरडेपणा

प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार गेल्या २ दिवसापासून वातावरणात कोरडेपणा जाणवत आहे. त्याशिवाय नैऋत्य मोसमी पाऊस महाराष्ट्रातून माघारी परतत असल्यानं वातावरणात अधिक उष्मा जाणवत आहे. पुढील २ दिवसांत तुरळक पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे.


आरोग्याच्या तक्रारी

या बदलेल्या वातावरणामुळे आरोग्याच्याही अनेक तक्रारीही उद्भवल्या असून ताप, सर्दी, खोकला अशा आजारांनी डोके वर काढलं आहे. उन्हामुळे आणि ढगाळलेल्या वातावरणाने डोकेदुखीच्या तक्रारीही समोर येत आहेत. त्यामुळं मुंबईकरांनो, बाहेर पडताना किंवा फिरताना थोडसं सावधानता बाळगण्याची गरज आहे.



हेही वाचा-

यंदाही पाऊस कमी, सप्टेंबर कोरडाच

हैद्राबाद, उत्तराखंड, दिल्लीवासीयही म्हणताहेत सेव्ह आरे!



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा