Advertisement

यंदाही पाऊस कमी, सप्टेंबर कोरडाच

हवामान विभागाच्या अंदाजानुसार मान्सून वेळेवर दाखल झाल्याने जून व जुलै महिन्यात पावसानं चांगली कामगिरी केली. परंतु त्यानंतर ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात एक दोन हलक्या सरी वगळल्यास हे दोन्ही महिने मुंबईकरांसाठी कोरडे ठरले.

यंदाही पाऊस कमी, सप्टेंबर कोरडाच
SHARES

गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदाच्या वर्षी पाऊस कमी पडल्याचं हवामान खात्याच्या आकडेवारीवरून स्पष्ट झालं आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार मान्सून वेळेवर दाखल झाल्याने जून व जुलै महिन्यात पावसानं चांगली कामगिरी केली. परंतु त्यानंतर ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात एक दोन हलक्या सरी वगळल्यास हे दोन्ही महिने मुंबईकरांसाठी कोरडे ठरले. विशेष म्हणजे सप्टेंबर महिन्यात फक्त २२ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे.


घटता पाऊस

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, २०१४ साली जून ते सप्टेंबर या कालावधीत कुलाबा इथं २ हजार १३५ मिमी तर सांताक्रूझ इथं २ हजार ३०० मिमी पावसाची नोंद करण्यात आली होती. २०१४ साली ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात केवळ एकच दिवस मुसळधार पावसाची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर २०१५ सालीही जून महिन्यात फक्त ६ दिवसच मुसळधार पावसाची नोंद करण्यात आली असून कुलाबा १ हजार ६०५ मिमी व सांताक्रूझ १ हजार ८२३ मिमी इतक्या कमी पावसाची नोंद करण्यात आली होती.


सरासरीपेक्षा जास्त पाऊस

त्यानंतर २०१६ व २०१७ साली पावसाचं प्रमाण चांगलंच वाढलं असून सरासरीपेक्षा जास्त पाऊस या दोन्ही वर्षी झाला होता. २०१७ साली कुलाबा वेधशाळेनं २ हजार २५३ मिमी, तर सांताक्रूझ वेधशाळेनं २ हजार ९४६ मिमी पावसाची नोंद केली होती. मात्र यंदाच्या वर्षी हे प्रमाण पुन्हा एकदा कमी झालं असून सप्टेंबरपर्यंत कुलाबा इथं १ हजार ७७९ मिमी आणि सांताक्रूझ येथं २ हजार २४० मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे २०१४ सालापासून सप्टेंबर महिन्यामध्ये सर्वात जास्त पावसाची नोंद २०१६ साली १४२.२ मिमी तर २०१७ साली ३०३.७ मिमी इतकी करण्यात आली आहे.


मोसमी पाऊस माघारी

दरम्यान सध्या देशातून नैऋत्य मोसमी पाऊस माघारी जाण्यास सुरुवात झाली असून राजस्थान, गुजरातमधील कच्छ आणि अरबी समुद्राच्या काही भागातून मोसमी पाऊस शनिवारी परतला आहे. देशात केरळमधून मान्सून दाखल होत असला तरी राजस्थानमधून परतण्यास सुरुवात होते. परंतु मान्सूनचं आगमन आणि त्याचा परतीचा प्रवास यात गेल्या काही वर्षांपासून बदल होत असल्यानं दरवर्षी मान्सूनचा प्रवास उशिराने सुरू होतं आहे. यंदाही नियोजित वेळेपेक्षा हा प्रवास उशिरानेच सुरू झाल्याचं हवामान खात्यानं सांगितलं आहे.



हेही वाचा-

मुंबईत परतीच्या पावसाला सुरूवात; मुंबईकरांची तारांबळ

२५ सप्टेंबरपासून मान्सून मुंबईतून 'माघारी'


 

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा