Advertisement

मुंबईत थंडीचा कडाका वाढला, तापमान १९ अंशावर

पुढील २ दिवसांमध्ये थंडीचा कडाका आणखी वाढण्याची शक्‍यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे मुंबईकरांना येत्या २ दिवसांत कडाक्याच्या थंडीचा अनुभव घेता येणार आहे.

मुंबईत थंडीचा कडाका वाढला, तापमान १९ अंशावर
SHARES

बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळामुळे महाराष्ट्रासह मुंबईत थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. मुंबईत सांताक्रूझ परिसरात सोमवारी सकाळी १९ अंश सेल्सिअस तापमानाची हवामान खात्याकडून नोंद करण्यात आली. तर कुलाबा परिसरात २०.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. त्याशिवाय पुढील २ दिवसांमध्ये थंडीचा कडाका आणखी वाढण्याची शक्‍यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे मुंबईकरांना येत्या २ दिवसांत कडाक्याच्या थंडीचा अनुभव घेता येणार आहे.


चक्रीवादळाचा परिणाम

बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळामुळे राज्यातील तापमानात चांगलीच घट होत असून या वादळाचा परिणाम आणखी २ दिवस पाहायला मिळणार आहे. मंगळवारी १८ डिसेंबरला आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता असून आठवडा अखेरीस राज्यात १३ ते १४ अंश सेल्सिअस तापमानापर्यंत घट होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय पुढील २ दिवसांत उत्तरेकडून गार वारे वाहण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे.


संध्याकाळनंतर थंडी

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून मुंबईत पहाटे गार वारे वाहत असून मुंबईतील तापमानात दिवसेंदिवस घट होताना दिसत आहे. संध्याकाळ सहानंतर मुंबईकरांना थंडीची जाणीव होण्यास सुरुवात होत असून वाहणारे गार वारे आणि तापमानात होत असलेली घट यामुळे मुंबईकरांच्या शाली, स्वेटर, कानटोप्या कपाटाबाहेर आलेल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा