Advertisement

मुंबईत कडाक्याची थंडी, प्रदूषणात वाढ

विदर्भ, मराठवाड्यानंतर आता मुंबईतही थंडीचा कडाका वाढला आहे.

मुंबईत कडाक्याची थंडी, प्रदूषणात वाढ
SHARES

विदर्भ, मराठवाड्यानंतर आता मुंबईतही थंडीचा कडाका वाढला आहे. मंगळवारपासून मुंबईचं वातावरणात गारठा वाढू लागला आहे. बुधवारी मुंबईतील पारा १७ अंश सेल्सिअसपर्यंत घसरला.

मुंबईचं तापमान हे माथेरानच्या तापमानाइतकं घसरलं आहे. तर महाराष्ट्राचं मिनी काश्मिर असलेल्या महाबळेश्वरमध्ये पारा ६ अंशावर आला आहे

मुंबईत हवामानात गारठा वाढला आहे. उत्तरेकडील शीतलहरीमुळे मुंबईतील पारा खाली घसरला आहे. मुंबईतील सांताक्रुझ इथं १६ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. हे मुंबईतील या सत्रातील सर्वात नीचांकी तापमान आहे. सलग दोन दिवसांपासून मुबंईत तापमान कमी असल्यानं मुंबईकरांना माथेरानचा फिल येतोय.

महाराष्ट्राचे मिनी काश्मिर म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वरचा पारा गेल्या दोन दिवसांपासून ६ अंशावर येऊन पोहचला आहे. महाबळेश्वरमधील लिंगमळा परिसरा कमी तापमानाची नोंद झाली आहे. सध्या महाबळेश्वरमध्ये नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक येऊ लागले आहेत. त्यातच आज काही ठिकाणी हिमकण पाहायला मिळाले. मागील दोन वर्षापूर्वीही आजच्या दिवशी हिमकण पाहायला मिळाले होते.

वाशिमचं कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस इतकं आहे. तर कमाल तापमान हे ११ अंश सेल्सिअसवर पोहोचलं होतं. परभणी जिल्ह्यात कडाक्याची थंडी पडत आहे. परभणीचा पारा ५.५ अंशावर पोहोचला आहे. शहरासह ग्रामीण भागात थंडीची लाट पसरली आहे.



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा